Abu Dhabi Temple: अबुधाबी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन होत आहे. युनायटेड अरब आमिरातीच्या राजधानीमध्ये असणारे हे १०८ फूट उंच मंदिर अगदी खास आहे. एवढ्या उंचीचे असूनही या मंदिराच्या बांधकामामध्ये स्टील किंवा लोखंडाचा वापर झाला नाही.
हे मंदिर पुढील एक हजार वर्षे सुस्थितीत ठेवण्याच्या उद्देशाने उभारले आहे. या मंदिराच्या अभिषेक मंडपाचे काम अद्याप सुरू आहे. हे मंदिर बनवण्यासाठी ३० हजारांहून अधिक दगडांचा वापर केला जातोय. यातील सर्व पिलर्स आणि स्लॅब राजस्थानात तयार करुन, नंतर अबुधाबीला नेले आहेत.
मंदिराच्या निर्मितीचा खर्च सुमारे ८८८ कोटी रुपये आहे. २७ एकर एवढ्या मोठ्या परिसरात हे मंदिर आहे. मंदिराची छत, पाया आणि खांबांवर सुमारे ३५० सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. हे सेन्सर दगडांवरील दबाव, तापमान आणि अगदी अंडरग्राऊंड हालचालींवर देखील लक्ष ठेवतील. भूकंप, वातावरणातील बदल अशा गोष्टींची आगाऊ कल्पना हे सेन्सर देतील. याव्यतिरिक्त मंदिरातील एखादा भाग ठिसूळ होण्याची शयता असल्यास, त्याची माहिती देखील हे सेन्सर देतील. मंदिरातील दगडाच्या प्रत्येक विटेला युनिक नंबर देण्यात आला आहे.
राजस्थानात निर्मिती झाली असली, तरी त्यासाठी ईटलीवरून मोठ्या प्रमाणात संगमरवर मागवले आहे. मंदिराच्या निर्मितीत राजस्थानातील ले स्टोनचा वापरही करण्यात आला आहे. या मंदिरात इतरही बर्याच सुविधा आहेत. मंदिर परिसरात एक व्हिजिटर्स सेंटर, प्रेयर हॉल, लर्निंग एरिया, लहान मुलांसाठी प्ले एरिया, थीम गार्डन, एझिबिटर्स, फूड कोर्ट, पुस्तकांचे दुकान आणि गिफ्ट शॉप आहे.