spot_img
देशसेन्सेक्स 750 अंकांनी गडगडला! रिलायन्सला 'इतक्या' कोटींचा फटका

सेन्सेक्स 750 अंकांनी गडगडला! रिलायन्सला ‘इतक्या’ कोटींचा फटका

spot_img

नवी दिल्ली | वृत्तसंस्था
भारतीय शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशीही घसरण सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी बेंचमार्क निर्देशांक नकारात्मक उघडले. सकाळी 10:30 वाजेपर्यंत सेन्सेक्स 750 अंकांनी घसरला होता, तर सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी 23,000 अंकांच्या खाली घसरल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये बीएसई सेन्सेक्स 2,290.21 अंकांनी किंवा 2.91 टक्क्‌‍यांनी, तर निफ्टी 667.45 अंकांनी किंवा 2.81 टक्क्‌‍यांनी घसरला आहे.

सेन्सेक्समध्ये सूचीबद्ध असलेल्या 30 कंपन्यांपैकी महिंद्रा अँड महिंद्रा, झोमॅटो, रिलायन्स इंडस्ट्रीज, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, आयटीसी आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत. दुसरीकडे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांचे शेअर्स नफ्यात होते.

डिसेंबर 2024 च्या विक्रमी उच्चांकावरून स्मॉलकॅप निर्देशांक 20% ने घसरला असून, मिडकॅप निर्देशांक त्याच्या विक्रमी उच्चांकावरून 18% ने घसरला आहे. आज बाजार उघडल्यानंतर सुरुवातीला, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसीमध्ये सर्वाधिक दबाव दिसून आला.या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजने बाजारावर सर्वाधिक दबाव आणला आहे. बुधवारच्या व्यवहारातच, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवलात सुमारे 29,400 कोटी रुपयांची घट झाली. या आठवड्यात आरआयएलचे बाजार भांडवल 56,500 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. याबाबत सीएनबीसी आवाजने वृत्त दिले आहे.

आशियाई बाजारात, चीनचा शांघाय कंपोझिट तोट्यात तर जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँग सेंग आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी नफ्यात पाहायला मिळाले. मंगळवारी अमेरिकन बाजार सकारात्मक ट्रेंडसह बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.34 टक्क्‌‍यांनी घसरून 76.74 डॉलर प्रति बॅरलवर व्यापार करत आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (ऋखख) 4,486.41 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत.

मंगळवारी 1000 अंकांनी घसरला होता सेन्सेक्स
दरम्यान काल मंगळवारी दिवसभर सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही निर्देशांक नकारात्मक पाहायला मिळाले. दिवसाच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स 1,018.20 अंकांनी म्हणजेच 1.32 टक्क्‌‍यांनी घसरून 76,293.60 वर बंद झाला होता, तर एनएसई निफ्टी 309.80 अंकांनी म्हणजेच 1.32 टक्क्‌‍यांनी घसरून 23,071.80 वर बंद झाला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सातव्या मजल्यावरून कोसळला कामगार; जागीच मृत्यू, अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील कल्पवृक्ष सोसायटीमध्ये सुरू असलेल्या इमारत बांधकामादरम्यान...

सासुरवाडीने काढला जावयाचा काटा! घरगुती वादात कुऱ्हाडीने वार नंतर…

Maharashtra Crime : कौटुंबिक वादाचे रूपांतर हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नातेसंबंधातील...

आजचे राशी भविष्य! दोन राशींसाठी आजचा दिवस लाभदायक… वाचा तुमच्या राशीत आज काय?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका - अन्यथा...

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....