spot_img
ब्रेकिंगखळबळजनक! 'खलीबली' चा बेवारस अवस्थेत आढळला मृतदेह

खळबळजनक! ‘खलीबली’ चा बेवारस अवस्थेत आढळला मृतदेह

spot_img

Maharashtra Crime News: ‘आय लव्ह यू’ म्हणाल्याचा राग मनात धरून दोन तरुणांनी मिळून एका ३५ वर्षीय व्यक्तीचा बेदम मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीचा मृतदेह बेवारस अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. खून झालेल्या व्यक्तीचे नाव साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय ३५) असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय २१) आणि समर्थ उर्फ पप्पू करण शर्मा (वय २२) अशी आहेत.

१२ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता चंदननगर येथील आंबेडकर वसाहतीत पोलिसांना एक मृतदेह बेवारस अवस्थेत आढळल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवून, शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले. पोस्टमार्टम अहवालात जबर मारहाणीचे स्पष्ट उल्लेख आढळल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

पोलिस तपासात उघडकीस आले की, मृत साईनाथने आरोपी आदित्य वाल्हेकर याच्या चुलतीला छेडल्यासारखे वर्तन केले होते आणि तिला ‘आय लव्ह यू’ असेही म्हटले होते. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आदित्यने आपल्या मित्राच्या मदतीने साईनाथला हॉकी स्टिकने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर दुखापत झाल्याने साईनाथचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

आरोपी आदित्य वाल्हेकर यानेच पोलिस नियंत्रण कक्षाला “एक व्यक्ती पडलेला आहे” अशी माहिती देऊन संशय टाळायचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या कसोशीच्या तपासामुळे खरे चित्र समोर आले आणि त्यानेच खून केल्याची कबुली दिली. चंदननगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...