spot_img
देशखळबळजनक! भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारली, भाजप आक्रमक..

खळबळजनक! भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारली, भाजप आक्रमक..

spot_img

Politics News: राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनता दरबारात हल्ला झाला आहे. भर कार्यक्रमात एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावली आहे. या घटनेनंतर दिल्ली आणि देशात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी यावरून भाजपवर निशाणा साधलाय. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

मुख्यमंत्री निवासस्थानावरील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेखा गुप्ता या जनता दरबारमध्ये उपस्थित होत्या. त्यावेळी एक व्यक्ती तक्रार घेऊन त्यांच्याकडे आला. मुख्यमंत्री त्याचे म्हणणं ऐकत होत्या, त्याचवेळी त्या तरूणाने जोरदार हल्ला केला. त्याने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कानाखाली चपराक लगावली. त्यानंतर जनता दरबारात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ त्या तरूणाला ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आठवड्यातून एकदा जनता दरबार घेतात. आज सकाळीही त्या जनता दरबारमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी तरूणाने त्यांच्या कानाखाली लगावली. पोलिसांनी त्या तरूणाला ताब्यात घेतले आहे. दिल्लीचे भाजप प्रवक्ता प्रवीण शंकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारावेळी एक व्यक्ती त्यांच्याकडे आला. त्याने रेखा गुप्ता यांच्याकडे काही कागदपत्रे दिली. त्यानंतर जोरात ओरडला अन् कानाखाली लगावली.

नवी दिल्लीच्या भाजप मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्या तरूणाचे वय अंदाजे ३५ वर्षे असल्याची माहिती मिळाली आहे. दिल्लीच्या भाजपकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भाजप नेता रमेश बिधूडी म्हणाले की, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न जाणूनबुजून केला. जनता कार्यक्रम रद्द करण्यात यावा, त्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कान्हूरपठार: लाल मातीच्या मैदानात रंगणार कुस्त्यांचा आखाडा; श्रावणी बैल पोळ्याची जय्यत तयारी, नृत्यांगना हिंदवी पाटील लावणार हजेरी

कान्हूरपठार। नगरसह्याद्री:- कान्हूरपठा (ता.पारनेर) येथे येत्या शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या श्रावणी बैल पोळ्याच्या...

बिना सोलरची विज? पारनेर नगरपंचायतीत ‘सोलर’ घोटाळा? कोणी केला आरोप, वाचा सविस्तर..

पारनेर । नगर सहयाद्री :- पारनेर नगरपंचायतीच्या तराळवाडी कचरा डेपोमध्ये सोलर प्रकल्प उभारण्यासाठी ९...

नगरकरांनो सावधान! पिझ्झा, बर्गर खाण्याचा मोह बीतेल जीवावर, नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पिझ्झा आणि बर्गरचे वेड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. मात्र, यामागे...

डोळे उघडण्याआधीच बाळाने जग सोडले, पण आईसाठी देवदूत ठरले आरोग्य कर्मचारी!

कोल्हापूर । नगर सहयाद्री कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावड्यातील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत असतानाच, बोरबेट येथील...