spot_img
ब्रेकिंगखळबळजनक! विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी बोगस मतदारांची नोंदणी?; अहिल्यानगर मधील प्रकार

खळबळजनक! विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी बोगस मतदारांची नोंदणी?; अहिल्यानगर मधील प्रकार

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान आणि मतदार वाढल्याची चर्चा सुरू असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोळवाडी ग्रामपंचायतीची मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली. आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेर राहणाऱ्या नागरिकांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचे दिसून आले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ज्या ग्रामपंचायतीच्या मुदत संपल्या आहेत किंवा संपणार आहेत. अशा ग्रामपंचायतींची निवडणुकीची प्रक्रिया अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये सुरू झाले आहे. याच अनुषंगाने प्रारूप मतदार याद्या तहसील कार्यालय व ग्राम पंचायत कार्यालय बाहेर लावण्यात आली आहे. व या प्रारूप मतदार याद्यांवर हरकती घेण्याचे काम देखील सुरू झाले आहे.

कर्जत तालुक्यातील कोळवडी ग्रामपंचायत मध्ये एका प्रभागांमध्ये तब्बल २०० पेक्षा जास्त बोगस मतदारांची नावे नोंदवण्यात आली आहे. ही अशी नावे आहेत की ते मतदार ग्राम पंचायतीच्या अंतर्गत असणाऱ्या कार्यक्षेत्रामध्ये राहत नाहीत. असे असताना देखील त्या नागरिकांची नावे मतदार यादी मध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली असून, संतप्त ग्रामस्थांनी थेट तहसील कार्यालय मध्ये येऊन मतदार यादीतील ची नावे रद्द करावी या मागणीसाठी प्रांत अधिकारी, तहसीलदार, निवडणूक अधिकारी, यांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी आबा कवडे, सागर नलवडे ,गणेश दवणे, परशुराम राऊत ,आबा थोरात ,महादेव राऊत, चंद्रकांत कवडे ,पांडुरंग दवणे, विठ्ठल दवणे, गणेश सुरवसे, संजय दवणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना, सागर नलावडे व आबा कवडे यांनी सांगितले की, कर्जत नगरपंचायत हद्दीमधील भांडेवाडी येथील प्रभाग क्रमांक 17 मधील व तालुक्यातील अन्य भागातील अनेक बोगस नावे तालुक्यातील कोळवडी ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये नोंदवण्यात आली आहेत. हे सर्व बोगस मतदार जे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये राहत नाहीत, असे जवळपास २०० नावे समाविष्ट करण्यात आले आहेत. ही सर्व बोगस मतदारांची नावे तात्काळ वागळावी अशी आमची मागणी आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणामध्येब बोगस मतदारांची नोंदणी केली आहे. यामध्ये काही मतदार ज्यांनी कर्जत नगर पंचायत हद्दी मध्ये घरकुलाचा देखील लाभ घेतलेला आहे. याची सर्व पुरावे आम्ही दिले आहेत. अशा बोगस व येथे न राहणाऱ्या नागरिकांची नावे मतदार यादीत आल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. असे म्हणत ग्रामस्थांच्या वतीने हरकती घेण्यात आल्या असून तसे पत्र तहसीलदार व निवडणूक अधिकारी यांना दिले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पैसा झाला खोटा, घोटाळा झाला मोठा जादा परताव्याचे आमिष ; अहिल्यानगरकरांचे करोडो रुपये लुटले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जादा परताव्याचे आमिष, महिनाभरात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवत जादा...

‌‘एपीएमसी‌’ मार्केट नवी मुंबईतून हद्दपार?, वाचा कारण..

नवी मुंबई | नगर सह्याद्री मुंबईतील वाढती लोकवस्ती, वाहतुकीचे प्रश्न आणि जागेची अनुपलब्धता या कारणांसाठी...

भयंकर अपघात: रेल्वेची क्रॉसिंग पॉईटवर शाळेच्या बसला जोरदार धडक, अनेक चिमुकले..

Railway Crossing Accident: तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानगुप्पम भागात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला....

बावडी शिवारात धक्कादायक प्रकार; चार आरोपींना तात्काळ अटक!, नेमकं काय घडलं?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील बावडी शिवारात गायी व गोऱ्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार...