अहमदनगर | नगर सह्याद्री:-
बनावट टी.ई.टी. प्रमाणपत्र काढुन घेऊन शासनाची फसवणूक केेल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या उपशिक्षण अधिकारी राजश्री मधुकर घोडके यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी तत्कालिन प्रभारी शिक्षणअधिकारी गुलाब जी सय्यद, सी.एस.धनवळे, नासिर ख्वाजालाल खान, शेख दानीश जब्बार खान इम्रान अय्युब यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ए.टी.यु. जदिद उर्दू प्राथमिक शाळा अहमदनगर या शाळेचे मुख्याध्यापक नासिर ख्वाजालाल खान यांनी १७ फेब्रुवारी २०२० रोजी शाळेतील दोन शिक्षक शेख दानीश जब्बार व खान इम्रान अय्युब यांचा वैयक्तीक मान्यतेचा प्रस्ताव कार्यालयास सादर केला होता.
प्रस्तावा सोबत शिक्षक पात्रता परिक्षा २०१८ चे प्रमाणपत्रच्या झेरॉस प्रती जोडण्यात आल्याने मुळ प्रमाणपत्राची मागणी करण्यास्तव २२ मे २०२० रोजी आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांना या कार्यालया मार्फत पत्र देण्यात आले होते. सदर पत्राचे अनुषंघाने २९ मे २०२० रोजी आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. यांनी पत्रान्वये वरील दोन्ही शिक्षकांचे टी.ई.टी. प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले असुन संबंधीतावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत आदेशीत केले होते. कार्यालयाचे आदेशअसुन शिक्षण अधिकारी (प्राथमिक) गुलाब गफुर सय्यद यांनी ३१ मार्च २०२१ अन्वये शिक्षक शेख दानीश जब्बार व खान इम्रान अय्युब या शिक्षकांना एकाच पत्राद्वारे शिक्षण सेवक व सहशिक्षक म्हणून मान्यता प्रदान केली होती. संबंधीत मान्यता आदेशाचे आवक जावक रजि तसेच टिपणी मध्ये कुठल्याही प्रकारची नोंद नसल्याचे चौकशी दरम्यान आढळले.
२४ फेब्रुवारी २०२२ रोजीचे या कार्यालया कडील शिक्षक शेख दानीश जब्बार व खान इम्रान अय्युब या शिक्षकांचे मान्यतेचे अनुषंघाने शालर्थ प्रणाली मध्ये नाव समाविष्ठ करणे कामी प्रस्ताव बाबत शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणी दरम्यान संबंधीतांचे टी.ई.टी. परिक्षेचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले. याप्रकरणी कर्तव्यात कसुर केल्याचे आढळून आल्याने सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी संबंधीतांची चौकशी करून कारवाई करण्याबाबत सांगितले. याबाबत शिक्षण अधिकारी यांनी चौकशी केली. या अहवालात कायदेशीर कार्यालयीन पध्दतीचा अवलंब न करता आवक जावक रजिष्टरला कुठलीही नोंद न घेता शिक्षण अधिकारी प्राथमिक यांचे स्वक्षरीने संबंधीत शिक्षकांच्या वैयक्तीक मान्याता देण्यात आल्याचे नमुद केले आहे. उपरोक्त बाबींचे अवलोक करता व प्राप्त शिक्षण उपसंचालक (प्रशासन) यांचे पत्रातील नमुद केल्या प्रमाणे गुलाब जी.
सय्यद तात्काळी प्रभारी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर सी.एस. धनवळे तात्काळीन कनिष्ठ सहाय्यक प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर, नासिर ख्वाजालाल खान ए. टी.यु. जदीद उर्दु प्राथमिक शाळा अहमदनगर येथील मुख्याध्यापक, शेख दानीश जब्बार, खान इम्रान अय्युब शिक्षक ए.टी.यु. जदीद उर्दू प्राथमिक शाळा अहमदनगर यांनी संगणमताने वैयक्तीक मान्यता दिलेल्या मुळ संचिकेमधील बनावट टी.ई.टी. प्रमाणपत्र काढुन घेऊन शासनची फसवणुक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.