spot_img
महाराष्ट्रनगरमध्ये खळबळ! मंतिमंद मुलीवर अत्याचार; बड्या नेत्याला अटक

नगरमध्ये खळबळ! मंतिमंद मुलीवर अत्याचार; बड्या नेत्याला अटक

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
भाकप (भारतीय कम्युनिस्ट पक्ष) राज्य कौन्सिल सदस्य संजय नांगरे याला एका मतिमंद मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी मंगळवार, २७ मे २०२५ रोजी मुंबई येथून अटक केली. या प्रकरणात पीडित मुलीच्या बहिणीच्या तक्रारीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाने आरोपी नांगरे याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुरुवातीला विनयभंग आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता, परंतु वैद्यकीय तपासणीनंतर अत्याचाराची पुष्टी झाल्याने वाढीव कलमांतर्गत कारवाई करण्यात आली.

शेवगाव तालुक्यातील या प्रकरणाने स्थानिक समाजात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवली आहे. संजय नांगरे, जो भाकपचा राज्य कौन्सिल सदस्य आहे, त्याच्यावर एका मतिमंद मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. ही घटना १० मे २०२५ रोजी घडली, आणि पीडित मुलीच्या बहिणीने १५ मे रोजी शेवगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार, नांगरे याने पीडित मुलीला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिचा विश्वास संपादन केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सुरुवातीला या प्रकरणात विनयभंग आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र, पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले, आणि त्यानुसार वाढीव कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘गाडी बाजूला घे’ म्हटल्याचा राग; एसटी बसचालकाला मारहाण, बसवर दगडफेकही

  अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील पुणेरोड बसस्थानकाजवळील स्वस्तिक चौकात ‘एसटी बस वळवण्यास अडथण होत आहे,...

दारूड्याचा भाऊजीवर सपासप चाकूहल्ला ; कुठे घडला प्रकार पहा

लालटाकी येथे कौटुंबिक वाद विकोपाला; पत्नीलाही बेदम मारहाण अहिल्यानगर | नगर सह्याद्री येथील लालटाकी भागातील बारस्कर...

प्रस्तापितांचा विरोध पत्करला पण शिवाजीराव कर्डीले यांनी सर्वसामान्यांशी नाळ तुटू दिली नाही, आता अक्षय कर्डीले यांनी…

  आम्ही सर्व अक्षय कर्डिलेंच्या पाठिशी ः प्रा. राम शिंदे/ सहकार सभागृहातील सर्वपक्षीय शोकसभेत स्व....

उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे महाराष्ट्रात पडघम वाजले आहेत....