spot_img
अहमदनगर'ज्येष्ठ रंगकम पी.डी. कुलकर्णी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान'

‘ज्येष्ठ रंगकम पी.डी. कुलकर्णी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान’

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
नगरमध्ये झालेल्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ रंगकम प्रवीण कुलकर्णी तथा पी.डी. काका यांचा नाट्य परिषदेच्या अहिल्यानगर उपनगर शाखेच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. विधानपरिषदेचे सभापती नामदार प्रा. राम शिंदे व संमेलनाध्यक्ष पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पी.डी. कुलकर्णी यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ रंगकम प्रशांत दामले, अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, अशोक हांडे, 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, सिनेनाट्य अभिनेते भरत जाधव, विभागीय नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. बापूसाहेब कांडेकर, संमेलन प्रमुख क्षितिज झावरे, उपनगर शाखा अध्यक्ष प्रा.प्रसाद बेडेकर, प्रमुख कार्यवाहक चैत्राली जावळे, व नाट्य परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
पीडी काका म्हणून परिचित असलेले पी. डी. कुलकर्णी हे तब्बल पाच दशकांपासून रंगभूमीची सेवा करीत आहेत. ‘

आजही ते त्याच उत्साहाने योगदान देत आहेत. नगरमधील नव्या, जुन्या हौशी रंगकमसाठी ते हक्काचे मार्गदर्शक आहे. विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या अवघ्या 20 दिवसांच्या तयारीत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन आणि सक्रिय योगदान दिले. बँकिंग क्षेत्रात नोकरी, क्रीडा, साहित्य अशा विविध क्षेत्रात योगदान देताना त्यांनी सामाजिक कार्यातही मोठे योगदान दिले आहे. रंगभूमी म्हटले की आज वयाच्या सत्तरीतही त्य़ांचा उत्साह तरूणांनाही लाजवणारा असतो. स्वतः उत्तम अभिनेते, दिग्दर्शक असलेले पी. डी. कुलकर्णी उत्तम कलाकार घडवणारे शिक्षकही आहेत.

अनेक जणांना त्यांनी प्रथम रंगभूमीवर काम करण्याची संधी दिली. नगरचे भूषण असलेले पीडी काका गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ रंगभूमीवर कार्यरत असलेले नगरमधील एकमेव रंगकम आहेत. 22 वर्षांनंतर नगरमध्ये मराठी नाट्य संमेलन होत असताना त्यांचा नाट्य परिषदेने सर्व रंगकम व नाट्य रसिकांच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रति पंढरपूर पळशी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध : सुजित झावरे पाटील

आषाढी एकादशी निमित्त आरती व महापूजा; भाविकांची अलोट गर्दी/ पारनेर पोलीस प्रशासनाचा पळशी येथे...

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...