spot_img
अहमदनगरज्येष्ठ नेते खासदार शरद पवार शनिवारी नगर शहरात; अरुण पाटील कडू यांचा...

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार शनिवारी नगर शहरात; अरुण पाटील कडू यांचा अभीष्टचिंतन सोहळा

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्यातील सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रांत योगदान देणारे ज्येष्ठ नेते, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण पाटील कडू यांचा येत्या शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता अहिल्यानगर येथील सहकार सभागृह येथे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अभीष्टचिंतन सोहळा होणार असल्याची माहिती निमंत्रक तथा माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी दिली.

अरुण पुंजाजी पाटील कडू अभीष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती देतानडॉ. सुधीर तांबे म्हणाले की, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून काम करताना अरुण पाटील कडू यांनी प्रत्येक तालुक्यात रचनात्मक कामांची उभारणी केली आहे. याचबरोबर आयुष्यभर शैक्षणिक क्षेत्रात समर्पित भावनेने काम करताना रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम केले आहे.

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार अशा विविध क्षेत्रांत त्यांचे मोठे योगदान असून त्यांच्या 75व्या वर्षानिमित्त जिल्ह्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने शनिवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहांमध्ये त्यांचा अभीष्टचिंतन सोहळा होणार आहे. यावेळी ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे भूषविणार आहेत. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार यशवंतरावजी गडाख, खासदार नीलेश लंके, पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह अन्य विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार रोहित पवार, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार आशुतोष काळे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार काशीनाथ दाते, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार संग्राम जगताप, आमदार हेमंत उगले, आमदार विठ्ठल लंघे, आमदार विक्रमसिंग पाचपुते यांच्यासह जिल्ह्यातील माजी आमदार माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, महानगर बँकेच्या अध्यक्ष गीतांजलीताई शेळके, संभाजीराव फाटके, कॉ. सुभाष लांडे, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, अशोकराव गायकवाड, फिरोजभाई तांबटकर माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्यासह अन्य विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या अभीष्टचिंतन सोहळा व शेतकरी मेळाव्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिक, महिला, कार्यकर्ते व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सत्यजित तांबे व अरुण पाटील कडू अभीष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

‌‘संघर्षयात्री‌’ पुस्तकाचे प्रकाशन
अहिल्यानगर जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रांत मोठे योगदान देताना सातत्याने सामाजिक बांधिलकी ठेवून पुरोगामी विचार जपणारे अरुण पाटील कडू यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील विविध मान्यवरांच्या 75 लेखांचा ‌‘संघर्षयात्री‌’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये यावेळी होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात हळहळ! दुर्घटनेत १७ जणांचा अंत, काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - विरारच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा काही...

तुम्ही त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांचा खर्चपाणी तिथूनच चालतो, ते तुम्हाला काय पाणी देणार?, माजी खासदार विखेंची खासदार लंके यांच्यावर टीका!

कान्हूरपठार। नगर सहयाद्री:-  पठार भागाला पाणी मीच देणार, असे आश्वासन माजी खासदार सुजय विखे पाटील...

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, सरकार सावध, विखे पाटील म्हणाले, आम्ही…

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने...

सासऱ्यासह पत्नीवर कोयत्याने सपासप वार; सावेडी उपनगरात दारुड्या पतीचा भयंकर कांड

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील वैदुवाडी येथे दारुच्या नशेत पती अर्जुन राजू शिंदे याने...