spot_img
देश'एकटीला पाठव, बिल कमी करतो'; अभियंत्याची खळबळजनक मागणी

‘एकटीला पाठव, बिल कमी करतो’; अभियंत्याची खळबळजनक मागणी

spot_img

Crime News: बाराबंकीमधील एका शेतकऱ्याने विद्युत विभागाचा कार्यकारी अभियंता प्रदीप गौतम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “तुझी पत्नी खूप सुंदर आहे. तुला बिल कमी करायचे असेल तर तिला माझ्याकडे एकटी पाठव,” अशी मागणी या अधिकाऱ्याने केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्याने मुख्यमंत्री पोर्टलवर या संदर्भात तक्रार केली आहे. 13 मार्च रोजी अभियंता तपासणीसाठी त्यांच्या घरी पोहोचला होता, त्यावेळी त्याने ही मागणी केली, असा आरोप शेतकऱ्याने केला आहे. 31 जानेवारी रोजी विद्युत विभागाच्या कार्यालयात गेल्यावरही अधिकाऱ्याने तोडलेले कनेक्शन जोडून बिल दुरुस्त करण्याच्या नावाखाली हीच मागणी केली.

माझ्या घरात फक्त 2 एलईडी लाईट आणि 1 टेबल पंखा आहे, तरी मला 94 हजार 864 रुपये वीज बिल आले. 2 वर्षात इतके बिल कसे काय होऊ शकते? अधिकारी प्रदीप कुमारने वाईट हेतूने मला जास्त बिल पाठवले आणि पत्नीला त्याच्याकडे पाठवण्याची मागणी केली, असा आरोप शेतकऱ्याने केला आहे. अमरजीत रावत असे या शेतकऱ्याचे नाव आहे. घरात एसी, फ्रीज, कूलर नाही. 1 वर्षापासून वीज नाही. मागील वर्षी अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन कापून टाकले. त्यानंतर आजपर्यंत ते जोडले नाही, असेही शेतकऱ्याने सांगितले

दरम्यान, माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. संबंधिताविरोधात मी गुन्हा दाखल केला आहे. 13 मार्च 2024 रोजी आम्ही त्यांच्या घरचे कनेक्शन कापले होते. मी अमरजीत रावतला ओळखतही नाही. ते 31 जानेवारीलाच मला भेटायला आले होते, परंतु मी बाहेर असल्याने भेट झाली नाही. थकबाकी पैसे जमा करत नसल्याने वीज कनेक्शन कापले होते. असे प्रदीप कुमार यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...