spot_img
अहमदनगरस्व. वसंतराव झावरे यांची स्वप्ने पूर्ण करणार; कोण काय म्हणाले पहा...

स्व. वसंतराव झावरे यांची स्वप्ने पूर्ण करणार; कोण काय म्हणाले पहा…

spot_img

आ. काशीनाथ दाते | वासुंदे येथे स्व. आ. वसंतराव झावरे पाटील यांच्या पुण्यस्मरणनिमित्त कार्यक्रम

पारनेर | नगर सह्याद्री

स्व. दादांच्या बरोबर 25 वर्ष माझ्या सारख्या कार्यकर्त्यांने निष्ठेने काम केले आहे. स्व. दादांबरोबर नाळ जोडलेल्या कार्यकर्त्यांचा माझ्या आमदारकीच्या विजयात मोठा सहभाग आहे. त्यांनी पारनेर तालुक्याच्या विकासाची मोठी स्वप्ने पाहिली होती. मात्र गेल्या 10 ते 15 वर्षांत ती पूर्ण झाली नाही. त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठीच जनतेने मला निवडून दिले असून लवकरच त्यांची विकासाची स्वप्ने पुर्ण करणार असल्याची ग्वाही आ. काशिनाथ दाते यांनी दिली.

स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त शनिवार (दि. 8) रोजी वासुंदे येथे समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी वसंतराव झावरे स्मृती गंध पुरस्कार डॉ. नारायण महाराज जाधव, सुभाष पठारे, कै. शांताराम लंके (मरणोत्तर), शरद पवळे, नारायण गव्हाण, संतोष क्षीरसागर, देवा झिंजाड यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर, डॉ. नारायण महाराज जाधव, आ. काशिनाथ दाते, माजी जि.प. सदस्या सुप्रियाताई झावरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के, सभापती गणेश शेळके, भाजप नेते विश्वनाथ कोरडे, सुदेश झावरे पाटील, युवराज झावरे पाटील, राहुल पाटील शिंदे, सचिन पाटील वराळ, डॉ. अक्षयदीप झावरे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, वसंतराव चेडे, विक्रमसिंह कळमकर, संत निळोबाराय संस्थांचे विश्वस्त सुरेश पठारे, खडूं भुकन, सखाराम ठुबे, सुषमा रावडे, प्रियंका खिलारी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी केले. झावरे म्हणाले, स्व. दादांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त दादांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी भाऊसाहेब महारांच्या पावनभूमीत देवकृपा फाऊंडेशनच्या व वासुंदे ग्रामस्थांच्या वतीने समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. निवृत्ती महाराज किर्तनरूपी सेवेत म्यानाहून मऊ आणि वज्राहून कठीण शब्दात समाजातील गोष्टीवर प्रहार करत असतात. समाजातील नाठाळ प्रवृत्तीला काठी मारण्याचे काम इंदोरीकर महाराज करतात. स्व. दादांच्या स्मृती दिनानिमित्त याआधी शरदचंद्र पवार साहेब, ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार, डॉ. विकास महाराज मिसाळ यांचे कार्यक्रम, स्व. दादांचे विचार जनतेपर्यंत पोहचावे या उद्देशाने आयोजित करण्यात आले होते. यावेळी देवकृपा फाऊंडेशनच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील स्मृती पुरस्कार वितरण करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षणाचा GR फाडला, OBC नेते आक्रमक, आता राज्यव्यापी आंदोलन

पुणे / नगर सह्याद्री - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर...

संयमाने परिस्थिती हाताळत, अभूतपूर्व पेचातून मार्ग काढत कसोटीस उतरलेले संयमी नेतृत्व विखे पाटील खरेखुरे वास्तववादी संकटमोचक!

सारिपाट / शिवाजी शिर्के काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथील उपोषणात गिरीष...

मावा अड्ड्यावर छापा; एलसीबीची मोठी कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीत मावा अड्डयावर छापा...

जादा परताव्याचे आमिष; १.६० कोटींची फसवणूक, १५ आरोपी, पोलिसांनी केले असे…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरमध्ये इनफिनाईट बिकन इंडिया प्रा. लि. आणि ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट प्रा. लि....