गीतांजली शेळके । द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबीर
निघोज । नगर सहयाद्री:-
स्व. उदयदादा शेळके यांची समाज विकासाच्या कामांची प्रेरणा सर्वांना स्फुर्तीदायी असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालिकागीतांजली शेळके यांनी व्यक्त केले आहे.
संजीवनी प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, जिल्हा सहकारी बँक व जी एस महानगर बॅंकेचे माजी चेअरमन ॲड. उदय दादा शेळके यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार दि .११ फेब्रुवारी रोजी संजीवनी प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल कुरूंद येथील एसपीआयटी पॉलिटेक्निक येथे रक्तदान शिबीर, वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबीरात भाग घेऊन ॲड. उदय दादा शेळके यांना आदरांजली वाहिली.
यावेळी प्राचार्य सुनिल दत्त कापसे, तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे, जनसंपर्क अधिकारी सोनाली खांडरे, विठ्ठल आडसरे, रामदास शेळके, प्राचार्य सुनिल शेटे, प्रा.संदीप जाधव, निळकंठ सोनवणे आदी उपस्थित होते. पी एच डी पदवी प्राप्त केल्याबद्दल प्रा. विजय जाधव, प्रा. रविंद्र मंडलीक तसेच कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा गीतांजली शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. अहिल्यानगर येथील जनकल्याण संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संदीप जाधव यांनी केले तर प्राचार्य सुनिल शेटे यांनी आभार मानले.
सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी योगदान
ॲड. उदय दादा शेळके यांनी शेतकऱ्यांना पाठबळ देत सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी योगदान दिले आहे. जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील युवक उद्योजक झाला पाहिजे यासाठी युवकांना पाठबळ दिले. कुरुंद येथील संजिवनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पारनेर, शिरुर, श्रीगोंदा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीचा मार्ग दाखवीत राज्यात नावलौकिक मिळवून दिला आहे.
-डॉ. आबासाहेब खोडदे तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी डॉक्टर सेल