spot_img
अहमदनगरनगरमध्ये पुन्हा ताबेमारी! पत्राच्या शेडवर घातला 'जेसीबी'; आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

नगरमध्ये पुन्हा ताबेमारी! पत्राच्या शेडवर घातला ‘जेसीबी’; आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री ;-
सावेडी उपनगरातील मनमाड रस्त्यावर डी मार्ट शेजारी असलेल्या 10 गुंठे जागेवरील कंपाऊंड, पत्र्याच्या शेडचे जेसीबीच्या सहाय्याने नुकसान करून ताबा मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी (19 ऑगस्ट) दुपारी घडला. या प्रकरणी मयुर राजेंद्र कटारीया (रा. रामचंद्र खुंट, नगर) यांनी काल, मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी सात ते आठ व्यक्तींविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांचे आजोबा नतमल प्रेमराज कटारिया व त्यांचे मित्र सोमनाथ शामराव देवळालीकर यांनी दोघांनी मिळून 1994 साली मनमाड रस्त्यावर सर्व्हे नंबर 241/अ/4 येथे 10 गुंठे जमीन खरेदी केलेली आहे. दरम्यान, 2004 मध्ये फिर्यादीचे वडिल मयत झाल्याने सदर जमिनीला फिर्यादीचे वडिल राजेंद्र कटारीया, चुलते रशीक कटारीया, संजय कटारीया, आत्या मंगल चोपडा व नुतन काठेड हे सर्वजण वारस लागले. त्या जमिनीशेजारी मन्नु शेरा कुकरेजा, भरत कुकरेजा, राजेश कुकरेजा यांची देखील जमीन आहे.

त्यांच्याकडून फिर्यादीच्या जमिनीवर वारंवार अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने त्यांनी 2023 मध्ये मोजणी करून पत्र्याचे कंपाऊंट केले. सदर ठिकाणी सीसीटीव्ही बसून व्यावसायाकरीता दोन पत्र्याचे शेड उभे केले व सुरक्षेकरीता दोघांना ठेवले आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी 12:45 वाजेच्या सुमारास अनोळखी सात ते आठ व्यक्तींनी फिर्यादी यांच्या जमिनीवर येत कंपाऊंड, पत्र्याचे शेड, सीसीटीव्ही व इतर साहित्याचे जेसीबीच्या सहाय्याने नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिहार तो झांकी है, अहिल्यानगर अभी बाकी है!

मिलिंद गंधे / शहर भाजपच्या वतीने बिहारच्या निवडणूक विजयाचा जल्लोष अहिल्यानगर / नगर सह्याद्री - बिहार...

बिहारमध्ये NDA ला यश, महाराष्ट्रात जल्लोष, पेढे वाटले, ढोल वाजले

मुंबई / नगर सह्याद्री - बिहार विधानसभा निवडणूक २०२५चा आज (१४ नोव्हेंबर) निकाल जाहीर...

बिबट्यांचे हल्ले; पालकमंत्री विखेंनी घेतली मोठी भूमिका

बिबट्यांच्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा नियोजनातून ८ कोटी १३ लाखांचा निधी – पालकमंत्री डॉ....

श्रीरामपूर–बेलापूर मार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन जखमी

श्रीरामपूर/ नगर सह्याद्री    श्रीरामपूर–बेलापूर मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या राजपाल वस्त्रालय दालनासमोर गुरुवारी रात्री उशिरा...