श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
चोरणाऱ्या चोराला जेरबंद करण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे. १० लाख रुपये किंमतीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. महेंद्र बाळू सुपेकर ( रा. पुनर्वसन काष्टी ता. श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे.
श्रीगोंदा तालुक्यात मोटरसायकल चोरी जाण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढल्याने श्रीगोंदा पोलिसांकडूनदुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी शोध मोहीम आखण्यात आली आहे. दरम्यान, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना गुप्त बातमीदाराद्वारे श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काष्टी गावामध्ये एक इसम विना नंबर प्लेटच्या दुचाकीवर फिरत आहे अशी माहिती मिळाली.
पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी श्रीगोंदा पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाला श्रीगोंदा चौकात एक इसम विना नंबर प्लेटच्या दुचाकीवर फिरत असतांना मिळून आला. त्याच्याकडे गाडीचे नंबर प्लेट व कागदपत्र बाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी कोर्टाचे पार्किंग, श्रीगोंदा शहर ,काष्टी गावात व इतर वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याचे कबुली दिली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोकॉ आप्पासाहेब तरटे, पोकॉ प्रवीण गारुडकर करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पविभागीय पोलीस अधिकारीविवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षककिरण शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे यांचे पथकामधील पोना गोकुळ इंगावले, पोकॉ संदीप राऊत ,पोकॉ संदीप शिरसाठ ,पोकॉ अरुण पवार व पोकॉ रूपाली मोटे, पोकॉ राहुल गुंड, पोकॉ नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.