spot_img
अहमदनगरलेकाला पाहून आईने हंबरडा फोडला; ह्रदयद्रावक घटनेनं परिसर हादरला

लेकाला पाहून आईने हंबरडा फोडला; ह्रदयद्रावक घटनेनं परिसर हादरला

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
|प्रवरा नदीपात्रात मामा व भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. किरण सुरेश देठे (वय 28 रा.पाचेगाव ता. नेवासा) व त्यांचा भाचा अनुज प्रवीण भालेराव (वय 10 रा. खोसपुरी ता नगर) असे बुडून मृत्यू झालेल्या मामा भाच्याचे नाव आहे. एकुलता एक मुलगा बुडून मृत्यू पावल्याने घटनास्थळी आई वडिलांनी मोठा हंबरडा फोडला.

अंघोळीसाठी गेलेल्या मामा भाचे यांचा प्रवरा नदीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना पाचेगाव ता.नेवासा येथे गुरुवारी दि.21 नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या वाजेच्या सुमारास घडली आहे.अनुज भालेराव हा नुकताच आपल्या आई वडीलासोबत मामाच्या गावाला दिवाळी सणासाठी आलेला होता.

एकुलता एक मुलगा बुडून मृत्यू पावल्याने घटनास्थळी आई वडिलांनी मोठा हंबरडा फोडला.स्थानिक युवकांनी दोन्ही मृतदेह नदीपात्रातुच्या पाण्यातुन बाहेर काढले. मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी नेवासा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्याला माहिती कळविण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

  बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक पारनेर | नगर सह्याद्री अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने...

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...