spot_img
महाराष्ट्रनगर शहरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; स्कूल बस चालकाने केला विद्यार्थिनींचा विनयभंग

नगर शहरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; स्कूल बस चालकाने केला विद्यार्थिनींचा विनयभंग

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका नामांकित शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग तिच्याच स्कूल बसच्या चालकाने केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. 15 ऑक्टोबर) तपोवन रोडवरील ढवण वस्ती परिसरात घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संबंधित चालकाविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव बाळू दादा वैरागर (रा. मांजरसुंभा, ता. नगर) असे आहे.

पीडित मुलगी ही शहरातील एका हायस्कूलमध्ये दहावीत शिक्षण घेत आहे. सध्या सुरू असलेल्या सहामाही परीक्षेनंतर ती नेहमीप्रमाणे शालेय बसने घरी निघाली होती. सर्व इतर विद्याथ आपापल्या थांब्यावर उतरल्यावर बसमध्ये ती एकटीच राहिली. हीच संधी साधून आरोपी चालकाने बस तिच्या घरा जवळ थांबवली व मुलीच्या सीटजवळ येऊन तिचा हात पकडत तिच्यावर असभ्य वर्तन केले. तसेच, ही गोष्ट कुणाला सांगितलीस, तर तुला ठार मारीन, अशी धमकीही दिली.

घटनेदरम्यान परिसरातील काही तरुणांनी बसजवळ घडणारी हालचाल पाहून तात्काळ हस्तक्षेप केला. त्यांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. यानंतर पीडित मुलीची आई आणि मामा घटनास्थळी पोहोचले. घाबरलेल्या मुलीने घडलेली घटना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी थेट तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक के. चव्हाण करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी; GR बाबतच्या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान, उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मराठा...

पवार कुटुंब एकत्र येणार नाही? सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत दिली माहिती

बारामती / नगर सह्याद्री - दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे सर्वदूर...

ओबीसी समाजाला मोठा धक्का! आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : सुप्रीम कोर्टाकडून तेलंगणाच्या काँग्रेस सरकारला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम...

बेशिस्त वाहनचालकांना झटका; दीड लाखाचा दंड वसूल, शहरात पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांनी बुधवारी (दि. 15) धडक कारवाई...