spot_img
राजकारणबच्चू कडू-शरद पवारांत गुप्त चर्चा, जोवर शिंदे सीएम, तोवर मी महायुतीत..नेमकं काय...

बच्चू कडू-शरद पवारांत गुप्त चर्चा, जोवर शिंदे सीएम, तोवर मी महायुतीत..नेमकं काय म्हणाले बच्चू कडू..पहा..

spot_img

अमरावती / नगर सह्यादी : महाराष्ट्रातील राजकारण आता आगामी लोकसभा व विधानसभेच्या अनुशंघाने वेगाने फिरू लागलं आहे. महाविकास आघाडी असताना मंत्री असणारे व नंतर शिंदे गटासोबत भाजपसोबत गेलेले बच्चू कडू हे नेहमीच त्यांच्या शैलीमुळे चर्चेत असतात. त्यांनी मध्यंतरी महायुती सरकारला मंत्रिमंडळ विस्तारावरून घरचा आहेर दिला होता.

आता आज कडू यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार अमरावती दौऱ्यावर असून बच्चू कडूंच्या चांदूरबाजारमध्ये पवारांच्या स्वागताचे बॅनर लावले होते. कडू यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत त्यांच्या सोबत आहोत. शिंदे मुख्यमंत्री नसतील तेव्हा आम्ही वेगळा निर्णय घेण्याबदल बघू, असे महायुतीत राहण्याबद्दलचे सूतोवाच कडू यांनी केले आहे.

मदतीची जाणीव म्हणून शरद पवारांना आम्ही फोन केला आणि घरी येण्याच निमंत्रण दिले होते. आम्ही सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहोत. जिकडे आमचा राजकीय फायदा असेल तिकडे आम्ही जाण्याचा विचार करू. जस प्रत्येकजण आपलं चांगभलं पाहतो, तसा आम्हीही विचार करू, असे कडू म्हणाले.

बच्चू कडू यांच्या घरी दोघांत चर्चा
शरद पवार यांनी आमदार बच्चू कडू यांच्या घरी भेट दिली. शरद पवार यांच्यासोबत थोडी राजकीय आणि सामाजिक चर्चा झाल्याचे ते म्हणाले. जास्त शेतीवर चर्चा झाल्याचे ते म्हणाले. तसेच बऱ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात, तेवढ तारतम्य ठेवावे लागते, असे कडू म्हणाले. तसेच पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे हे रोजगार हमी योजनेत व्हावीत, हे तुमच्या अजेंड्यामध्ये असावे हे मी सांगितल्याचे कडू म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...