अहमदनगर | नगर सह्याद्री
केळी व्यापार्यांचे ऑफीस फोडत रोकड लंपास करणार्या दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी अवघ्या दोन तासात जेरबंद केले आहे. चंद्रकांत दिगंबर इंगळे (रा दुधसागर सोसायटी केडगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
या संदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात सागर मिलींद गायकवाड यांनी तक्रार दाखल केली होती. केळ्याचे गोडावूनचे आँफिस अज्ञात चोरट्याने कुलूप तोडुन आतील १ लाख १० हजारांची रोकड लंपास केली होती. सदरचा गुन्हा हा फिर्यादी यांचेकडे काही दिवसापूर्वी काम सोडून गेलेला कामगार यांनेच केला असल्याची माहिती समोर आली.
त्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यांचे पीआय प्रताप दराडे यांनी कारवाईच्या सुचना पोलिसांना दिल्या. चंद्रकांत दिगंबर इंगळे (रा दुधसागर सोसायटी केडगाव) यांचा शोध घेत त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता प्रथम त्याने मला काही एक माहीत नाही, असे सांगितले. त्यानंतर पोलिसी खाया दाखवताच त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुल केला. त्यांने लपवुन ठेवलेले १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला.