spot_img
अहमदनगरसरपंच पुत्र लाच-लुचपतच्या जाळ्यात; बुरुडगाव रोडला ‘असा’ लावला सापळा…

सरपंच पुत्र लाच-लुचपतच्या जाळ्यात; बुरुडगाव रोडला ‘असा’ लावला सापळा…

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर तालुक्यातील वाळुंज येथील सरपंच पुत्राला लाच स्विकारताना  लाच-लुचपतच्या विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मकरंद गोरखनाथ हिंगे ( वय- 40 वर्ष,धंदा-शेती, रा.वाळुंज, ता.जिल्हा अहिल्यानगर ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातबाधकाम ठेकेदाराने तक्रार केली होती.

तक्रारदार ठेकेदारीचा व्यवसाय करतात. त्यांनी वाळुंज ग्रामपंचायतच्या हद्दीत पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण केले. सदरच्या कामाचे बिल देखील मंजूर झाले. मात्र त्यासाठी कामाच्या पूर्णत्वाचा दाखला वाळुंज ग्रामपंचायतचे सरपंच यांच्याकडून तक्रारदार यांना हवा होता. दाखला देण्याच्या मोबदल्यात सरपंच यांचा मुलगा मकरंद हिंगे यांनी सरपंचांची सही घेऊन देण्याकरीता १ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती ४५ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधुन तक्रार केली.

त्यानुसार अधिकाऱ्यांनी शहरातील बुरुडगाव रोड, अहिंसा चौक येथे सापळा लावला. त्यावेळी लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता २५ हजार रुपये स्वीकारतांना मकरंद हिंगे याला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपाधीक्षक तथा तपास अधिकारी अजित त्रिपुटे यांच्या अधिपत्याखाली पोलिस निरीक्षक श्रीमती छाया देवरे यांच्या पथकातील पोलीस नाईक उमेश मोरे, महिला पोलीस हवालदार राधा खेमनर,पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, चापोहेकॉ. दशरथ लाड यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डोनाल्ड टॅम्प यांनी फोडला टॅरिफ बॉम्ब, शेअर बाजारात भूकंप, घडले असे…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केली...

सोलापूर हादरलं! थायलंडच्या भूकंपानंतर महाराष्ट्रातही 3 ठिकाणी धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

सोलापूर / नगर सह्याद्री - गेल्या आठवड्यात थायलंडमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याने बँकॉकसह शेजारील देशांमध्ये...

खडकी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; विद्यार्थ्यांचे ‘मिशन आरंभ’मध्ये उतुंग यश

खडकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम सुनील चोभे | नगर सह्याद्री जिल्हा परिषद...

डुप्लिकेट चावीची कमाल, चार लाख छूमंतरल; नगरमध्ये घडलं असं काही..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री घराचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडून आत प्रवेश करत 11 तोळे आठ...