बीड | नगर सह्याद्री:-
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदरर्शन घुले विषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. सुदर्शन घुलेविषयी महत्वाची माहिती आणि पुरावे एसआयटीच्या हाती लागले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुदर्शन घुलेची पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी एसआयटीने बीडच्या न्यायालयात अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात आणि खंडणी प्रकरणांमध्ये सुदर्शन घुले याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर सुदर्शन गुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही मिळाली होती. आता एसआयटीला पोलीस कोठडी मिळावी असा अर्ज मकोका कोर्ट विशेष न्यायाधीश सुरेखा आर पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. त्याद्वारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेची पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी एसआयटीकडून बीड न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आलाय. आरोपी सुदर्शन घुले संदर्भात काही पुरावे सापडल्यामुळे एसआयटी ला सुदर्शन घुलेची पोलीस कस्टडी हवी आहे .या संदर्भातला अर्ज मकोका कोर्ट विशेष न्यायाधीश सुरेखा आर पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्याकांडामध्ये आणि खंडणी प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाईही झाली आहे.
सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली होती. यावेळी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी पोलीस कोठडीचा अधिकार अबाधित ठेवावा असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. गरज पडल्यास आरोपी सुदर्शन घुलेसह इतर आरोपींना पोलीस कोठडी मागण्याचा अधिकार अबाधित ठेवावा असेही यात म्हटले होते. दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि मकोका अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील बीड जिल्हा न्यायालय मध्ये हजर आहेत .सरकारी पक्षाकडून वकील बाळासाहेब कोल्हेही हजर राहतील. आरोपीचे वकील तिडकेही बीड जिल्हा न्यायालयात हजर राहणार आहेत