Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उद्या परभणी जिल्हा दौऱ्यावर आहेत. उद्या ते परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वन परत भेट घेणार आहेत. तर उद्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या देखील कुटुंबांची जरांगे पाटील भेट घेणार आहे.कुणाचा बापही आला तरी देखील संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रकरण दबू देणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
तसेच 28 तारखेला बीड येथे होणाऱ्या मोर्चामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. बीड येथील मस्साजोगला येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणाने राजकारण तापलंय. देशमुख यांचे मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाहीये. याप्रकरणात त्या भागातील पोलीस अधीक्षकांचीही बदली करण्यात आली आहे.
परंतु याप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव पुढे येत आहे.या हत्याकांडाचे मास्टरमाईंड आहेत असा आरोप केला जात आहे. आता प्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उडी घेतली आहे. जरांगे-पाटील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषण आंदोलन करणार आहेत. त्यापूर्वी ते बीड येथील मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
याप्रकरणी बोलतांना जरांगे पाटील म्हणाले, कुणाचा बापही आला तरी देखील संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रकरण दबू देणार नाही, असं पाटील म्हणालेत.,कारवाई केव्हा करणार? एवढे दिवस लागतात का मोबाईल तपासायला, असा सवाल करत बीड जिल्ह्यातील जनतेने तपास हातात घेतला मग सरकारला कळेल,असंही जरांगे म्हणाले.