spot_img
महाराष्ट्रसंतोष देशमुख हत्त्या प्रकरणी खा. बजरंग सोनवणे संतापले; ५ मोठ्या मागण्या कोणत्या?

संतोष देशमुख हत्त्या प्रकरणी खा. बजरंग सोनवणे संतापले; ५ मोठ्या मागण्या कोणत्या?

spot_img

बीड | नगर सह्याद्री
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. त्याने जिल्हा ढवळून निघाला. या खूनाला 16 दिवस उलटूनही मुख्य आरोपी मोकाटच आहेत. बीड पोलीसांवर अगोदरच आरोपींना पाठीशी घालण्याचा आरोप होत आहे. तर सीआयडी सुद्धा आरोपींचा माग काढण्यास सपशेल अपयशी ठरल्याचे दिसते. त्यावरून विरोधक आता आक्रमक झाले आहे. शनिवारी याविरोधात विरोधक मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार सहभागी होणार असल्याची माहिती खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बीडचा बिहार होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. बीडमध्ये अराजकता, दहशतीचे आणि गुंडागद वाढली आहे. खंडणी वसूल करण्यात येत आहे. गुन्हेगारी वाढलेली आहे. त्याला राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घडामोडीवर खासदार सोनवणे यांनी संतापव्यक्त केला आहे. त्यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला. अजितदादांनी या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं, असे ते म्हणाले. अर्थात पालकमंत्री कुणीही व्हावं. कुणालाही करावं. पण संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला अटक करा, अशी मागणी त्यांनी केली.

या सर्व घटनेत पोलीसांच्या निष्क्रियतेवर आणि आरोपींना पाठीशी घालण्याच्या प्रकाराविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. शनिवारी बीडमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात शरद पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहे. बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी याविषयीची माहिती दिली. 28 डिसेंबर रोजीच्या मोर्चात कोण सहभागी होणार माहीत नाही. अंजली दमानिया सहभागी होणार की नाही माहीत नाही. पण मी मात्र या मोर्चात सहभागी होणार आहे. खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे. मी सहभागी होणार आहे, असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेर शहरातील कार्यकर्त्‍यांना मंत्री विखे पाटलांचा महत्वाचा संदेश; तयारी सुरु करा! आता शहरात विकासाची गंगा..

संगमनेर । नगर सहयाद्री: आ.अमोल खताळ यांच्‍या विजयाने तालुक्‍यात परिवर्तन होवू शकते हा विश्वास...

पालकमंत्रिपदावरून ताणाताणी; महायुतीत कोण-कोण नाराज?

मुंबई | नगर सह्याद्री:- महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यापासून सरकारमधील तिन्ही पक्षात कमालीची अस्वस्थता दिसून येत...

सावकारी टोळक्यांची दादागिरी; बंद पाडले व्यावसायिकचे दुकान, अहिल्यानगर शहरातील धक्कादायक प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या टोळक्यांनी व्याजापोटी दहशतीने दुकान बंद करुन, सातत्याने...

नगरमध्ये पावसाचा यलो अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात पुन्हा हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. 26...