spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी ! वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार ; आरोपपत्रात...

मोठी बातमी ! वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार ; आरोपपत्रात काय म्हटलंय पहा…

spot_img

बीड / नगर सह्याद्री :
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या 80 दिवसानंतर पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रामधून वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असल्याचे म्हटले गेले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून या गोष्टी आता सिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. या संदर्भातील माहिती एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीकडे
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड एक क्रमांकाचा तर विष्णू साठे दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी असल्याचे म्हटले गेले आहे. संतोष देशमुख यांची हत्या ही पूर्णतः खंडणीच्या वादामधून झाल्याचे आरोपपत्रातून सिद्ध झाले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती आणि या खंडणीनंतर झालेल्या वादामध्ये संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. 29 नोव्हेंबर रोजी सुदर्शनच्या फोनवरूनच वाल्मीक कराडने खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर सहा डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे याच्याशी वाद झाला होता. ही माहिती आता पाच गोपनीय साक्षीदारांच्या बाबानंतर कराडविरुद्ध पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणांमध्ये वाल्मीक कराड हाच प्रमुख सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा सीआयडीच्या हाती लागला आहे.

एसआयटी प्रमुख बसवराज तेली, तपास अधिकारी किरण पाटील तसेच खंडणी प्रकरणाचे तपास अधिकारी अनिल गुजर पाटील यांनी बीडच्या न्यायालयामध्ये संतोष देशमुख खून प्रकरणाचे चार्जशीट दाखल केलं आहे. यावेळी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे उपस्थित होते.गेल्यावर्षी 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची डोणगाव टोलनाक्यावरून अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत नऊपैकी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.

मागील 80 दिवसांत सीआयडी तसेच एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासानंतर हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होत होते. परंतु, दुसरीकडे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आपला तपास वेगाने पूर्ण करत दोषारोपपत्र दाखल केले आहे. आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहणार आहे. दरम्यान 80 दिवसांच्या आत हे प्रकरण न्यायालयात दाखल झाल्याने आता आरोपींना जामीन सुद्धा मिळणे कठीण होणार आहे. या सर्व प्रकरणात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चार्जशीटमध्ये आरोपींच्या ‘असा’ आहे क्रम
वाल्मिक कराड – एक नंबर
विष्णू चाटे- दोन नंबर
सुदर्शन घुले – तीन नंबर
प्रतीक घुले – चार नंबर
सुधीर सांगळे – पाच नंबर
महेश केदार – सहा नंबर
जयराम चाटे – सात नंबर
फरार कृष्णा आंधळे – आठ नंबर

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...