spot_img
महाराष्ट्रलाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार! ; 'या' तारखले मिळणार ३००० हजार?

लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार! ; ‘या’ तारखले मिळणार ३००० हजार?

spot_img

Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीत महायुती सरकाराने प्रचंड बहुमताने विजय मिळवला. त्यानंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्यात आले आहे. महायुतीला निवडणुकीत मिळालेल्या यशामागे लाडक्या बहि‍णींचा मोठा वाटा आहे. दरम्यान डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे.

अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण महायुती सरकार लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हफ्ते तीन हजार रुपये सक्रांतीआधी लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली. जुलै महिन्यापासून राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे मिळत आहेत. जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत ५ महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाला आहेत. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत ७५०० रुपये जमा झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता आधीच देण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या पैशांची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. पण या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हफ्ता एकत्र मिळणार आहेत.

अशामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचे दोन हप्ते (प्रत्येकी तीन हजार रुपये) दिले जातील, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.

‌‘लाडकी बहीण योजनेत तृतीय पंथीयांचा समावेश करावा‌’
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. महायुतीच्या विजयात या योजनेचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मानले जाते. मात्र, या योजनेच्या निकषांमध्ये बदल केला जाणार असल्याची चर्चा गेल्याकाही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आता भाजप आमदाराने या योजनेचा लाभ तृतीय पंथीयांना देखील मिळावा अशी मागणी केली आहे. भाजपचे मध्य नागपूर विधानसभेचे आमदार प्रवीण दटके यांनी ही मागणी केली आहे. सध्या 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना या योजनेंतर्गत दरमहिना 1500 रुपये दिले जातात. या योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये केली जाणार असून, रक्कमेचा पुढील हफ्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. दरम्यान, नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून 35 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कंटेनर चालकाचा प्रताप; दहा ते पंधरा गाड्यांना धडक, अनेकजण जखमी

पुणे / नगर सह्याद्री - चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरने दहा ते पंधरा...

मनपाचा ‘तो’ निर्णय अन्यायकारक! शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव म्हणाले, जनतेवर बोजा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांकडून दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी...

.. तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल; अविनाश घुले यांचा मनपाला इशारा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर शहरातील नागरिकांना रोज पाणी पुरवठा करावा आणि मगच पाणीपट्टीत वाढ...

कोरठण खंडोबा यात्रोत्सव उत्साहात; लाखो भाविकांनी घेतले दर्शन

पारनेर | नगर सह्याद्री:- पिंपळगाव रोठा ता पारनेर येथील राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र...