Maharashtra Politics News: माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतलं आहे. माजी खासदार विनायक राऊत हे विधानसभेतील निवडणुकीला कारणीभूत असल्याचं सांगत साळवी यांनी शिंदेंची वाट धरली. राजन साळवी यांनी शिंदे गटात केलेल्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. सत्ता गेल्यावर जो तडफडत राहतो त्याला शिवसैनिक म्हणत नाही, अशा शब्दात त्यांनी साळवींवर टीका केली आहे.
‘हे स्वत:ला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणतात. सत्ता गेल्यावर तडफड राहतो, त्याला शिवसैनिक म्हणत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनेक काळ सत्तेशिवाय राहिले, त्यांच्याबरोबर आम्हीही सत्तेशिवाय राहिलो’, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राजन साळवींना टार्गेट करत टीका केली आहे.’बाळासाहेबांनी त्यांच्या आयुष्यातील सगळा काळ सत्तेशिवाय काढला.
आम्हाला सत्ता फार उशिरा मिळाली. आमच्या स्वप्नातही नव्हतं, आम्ही कधी आमदार, किंवा खासदार होऊ. आम्ही सत्तेत नसतानाही बाळासाहेबांबरोबर राहिलो आणि यापुढेही राहू. आमच्यासाठी सत्ता हेच सर्वस्व नाही. संकटकाळात नेते पक्षाबरोबर राहिले पाहिजे. पक्षांतर्गत मतभेद नंतरही दूर करता येतात’, असंही संजय राऊत म्हणाले.