spot_img
ब्रेकिंगसंजय काका, काळजी घ्या! आदित्य ठाकरेंची पोस्ट; नेमकं काय लिहिलं?

संजय काका, काळजी घ्या! आदित्य ठाकरेंची पोस्ट; नेमकं काय लिहिलं?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत बिघाड झालीये. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांनी २ महिन्यांसाठी सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी या संदर्भात कार्यकर्त्यांसाठी पत्रक प्रसिद्ध करून माहिती दिली. राऊतांच्या तब्येतीबाबत माहिती समोर येताच राजकीय वर्तुळासह चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत प्रत्येकांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि ठणठणीत बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या. दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील संजय राऊत यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली. या भावनिक पोस्टची सोशल मीडियात चर्चा सुरू आहे.

आमदार आदित्य ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्यासाठी खास पोस्ट समाजमाध्यमांमध्ये शेअर केली आहे. ‘संजय काका, काळजी घे! प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून काका तू लढतोस. तसेच जिंकतोस. आता देखील तेच होणार, याची मला खात्री आहे’, असं आदित्य ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. आदित्य ठाकरे यांची संजय राऊतांसाठी लिहिलेली भावनिक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

दरम्यान, संजय राऊतांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीनींही पोस्ट लिहून बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. ‘लवकर बरे व्हा’ अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी संजय राऊतांच्या प्रकृतीबाबत सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच महायुतीतील अनेक नेत्यांनीही संजय राऊतांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली.

संजय राऊतांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?
‘जय महाराष्ट्र! आपण नेहमीच माझ्यावर विश्वास आणि प्रेम दाखवलंय. दरम्यान, माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूराचे बिघाड झाले आहे. सध्या उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सल्ल्यानुसार, मला गर्दीत जाणं आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं टाळावं लागेल. मला खात्री आहे मी लवकरच ठणठणीत बरा होईन. नवीन वर्षांत तुमच्या भेटीस येईन’, असं त्यांनी म्हटलंय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये गटशिक्षणधिकारी कार्यालयाचे कारनामे उजेडात!

शिक्षकांकडून गंभीर तक्रारी | गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाईसाठी शिक्षक संघटना सरसावल्या अहिल्यानगर । नगर सहयाद्री भ्रष्टाचार, आर्थिक...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : तीन टप्प्यात मतदान, पुढील आठवड्यात घोषणा

दुसर्‍या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती, महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात मुंबई | नगर सह्याद्री प्रभाग रचना, इतर...

‘तुम्ही डिजिटल अरेस्ट झालात!, सावेडीतील इंजिनीअला ९ लाखाला गंडवले, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर |  नगर सहयाद्री मुंबई सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल करून, ‘अवैध पार्सल’चा बनाव...

हे घ्या पुरावा! राज ठाकरेंनी आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला…, कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीच्या आरोपासंदर्भात निडणूक आयोगाला...