spot_img
अहमदनगरसंग्राम जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल; केली मोठी घोषणा...

संग्राम जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल; केली मोठी घोषणा…

spot_img

 

शहर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार – आ. संग्राम जगताप / अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला
अहिल्यानगर / नगर सह्याद्री-
अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपाचे समन्वयक महेंद्र भैय्या गंधे, सचिन जाधव, किशोर डागवाले, अविनाश घुले, प्राध्यापक माणिकराव विधाते, संजय चोपडा, रवींद्र बारस्कर, अमोल गाडे, प्रा. अरविंद शिंदे, संजय ढोणे, सतीश शिंदे, अजय चितळे, उदय कराळे, नरेंद्र कुलकर्णी, अभिजीत खोसे, वैभव ढाकणे, ज्ञानेश्वर काळे, अमित गटणे, मनोज ताठे, अजिंक्य बोरकर, सुमित कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप म्हणाले की, विधानसभेची निवडणूक ही विकासाच्या कामावर लढवली जात असून सर्वांना बरोबर घेऊन जनतेचे आशीर्वाद घेतले जातील. निवडणूक लढवीत असताना गेल्या दहा वर्षांमध्ये केलेली विकास कामे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले आहे, आपल्या शहरा बद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विकासाच्या योजना राबवत आहे. जनतेच्या मतरुपी आशीर्वादामुळे माझा विजय निश्चित असून पुढील ५ वर्षात विकास कामातून शहराचा कायापालट करेल असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...

नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन; लष्कर-ए-तैयबाचा मोठा प्ल्यान?

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्‌‍यानंतर पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरी करण्याच्या...

आमदार रोहित पवारांवर ईडीकडून आरोपपत्र दाखल; वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री :- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून मोठी...

अर्बन बँक घोटाळा प्रकरणात ‘ईडी’ ची एन्ट्री; ‘त्यांची’ चौकशी करणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर अर्बन बँकेतील सुमारे 291 कोटी रूपयांच्या घोटाळ्याची प्राथमिक चौकशी...