spot_img
अहमदनगरसंगमनेरची श्रेया महाराष्ट्र क्रिकेट संघात; गोलंदाज म्हणून निवड

संगमनेरची श्रेया महाराष्ट्र क्रिकेट संघात; गोलंदाज म्हणून निवड

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) यांच्या १५ वर्षातील मुलींच्या महाराष्ट्र संघाची घोषणा झाली या संघात संगमनेर येथील सह्याद्री विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी श्रेया सुनील शिंदे हिची उत्तम डावखुरी फिरकी गोलंदाज म्हणून महाराष्ट्र संघात निवड झाली.

पुढील बीसीसीआय आयोजित १५ वर्षाखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलींचा संघ जाहीर झाला असून सदर संघ २१ ते २९ नोव्हेंबर ओडीसा येथे महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. कुमारी श्रेया शिंदे हिला तिच्या वडिलांच्या असलेल्या क्रिकेटच्या आवडीमुळे श्रेयाला वडिलांकडून क्रिकेट खेळण्याची प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले व त्यामुळे तिची क्रिकेट खेळा संदर्भात आवड निर्माण झाली.

श्रेयाचे वडील सुनील व आई अश्विनी शिंदे या दोघांनीही या आपल्या मुलीच्या स्वप्न पूर्ततेसाठी अनेक दिवसापासून श्रम घेतले क्रिकेटच्या प्रॅक्टिस करीता दोघेही आई-वडील संगमनेर येथील मालपाणी हेल्थ क्लब ग्राउंडवर दिवसातून सहा ते सात तास प्रशिक्षण देत होते व या सर्व निवडीचे श्रेय शिंदे कुटुंबाने मालपाणी हेल्थ क्लबचे डायरेक्ट गिरीश मालपाणी व मालपाणी परिवाराचे विशेष आभार मानले आहे.

या निवडीकरीता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोषजी बोबडे सर, परभणी जिल्ह्याचे प्रशिक्षक बोरफळे सर ,सुहास पावडे सर यांचे मार्गदर्शन मिळाले. कुमारी श्रेया ही सध्या परभणी जिल्ह्याकडून खेळत असून डावखुरी फिरकी गोलंदाज म्हणून तिची निवड झाली आहे. श्रेयाला या यशापर्यंत पोहोचविण्यासाठी तिचे मुख्य प्रशिक्षक योगेश खरात सर सहशिक्षक अदिप वाघ सर, अभिषेक कदम सर ,व श्री प्रथमेश हसे सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.

श्रेयाच्या या निवडीबद्दल मा. आ. बाळासाहेब थोरात, भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाचे अध्यक्ष डॉक्टर सुधीरजी तांबे आ. सत्यजीत ताबें,. संजयजी मालपाणी, मुख्याध्यापक खेमनर सर , नगरसेवक किशोर पवार,व जानकीनगर रहिवासी व सुनील शिंदे मित्र मंडळाच्या वतीने तसेच संगमनेर क्रीडा रसिकांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात पुन्हा सैराट! बहिणीच्या बॉयफ्रेंडला आई अन् भावाने संपवलं

पुणे । नगर सहयाद्री :- पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बहिणीच्या बॉयफ्रेंडचा...

‘पुढील आठवड्यात सरपंच आरक्षण सोडत’

महिला आरक्षण उपविभागीय, तर सर्वसाधारण अन्य प्रवर्गाचे तहसील पातळीवर काढणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री ग्रामविकास विभागाने...

फडणवीस सरकारचा ‘मोठा’ निर्णय; अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार

गैरप्रकार सहन केला जाणार नाही: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई | नगर सह्याद्री रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच...

फलक लावणे गैर काय? ते माझे काका!; आमदार रोहित पवारांनी भूमिका केली जाहीर

कर्जत । नगर सहयाद्री:- कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर...