spot_img
अहमदनगरसंगमनेरच्या 'आका' ना पराभव पचला नाही! माजी मंत्र्यांचे सुपारीबाज आंदोलक मैदानात; महायुतीने...

संगमनेरच्या ‘आका’ ना पराभव पचला नाही! माजी मंत्र्यांचे सुपारीबाज आंदोलक मैदानात; महायुतीने पुन्हा डिचवलं..

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री:-
आंदोलन करणे हा आपलाच स्वयंभू अधिकार आहे आणि त्याचा वापर करुन सवंग प्रसिद्धीच्या झोतात राहाता येते. असे समजाणारी एक जमात संगमनेर शहरात कार्यरत आहे. अलिकडे या आंदोलन जीवी जमातीस जनता किंमत देत नाही म्हणून आता रिकाम्या झालेल्या माजी मंत्र्यांचा अजेंडा विविध कार्यक्रमात राबवण्याची सुपारीही घेण्याचा धंदा सुरु केला असल्याची टीका महायुतीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्यात घुसून धूडगुस घालणाऱ्या प्रवृत्तींचा महायुतीच्यावतीने निषेध करण्यात आला आहे.

या संदर्भात महायुतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यापूर्वी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मानभावीपणे माजी आमदार भेट द्यायला आले की, मुग गिळून गप्प बसायचे आणि राधाकृष्ण विखे पाटील आले की, निषेधाच्या घोषणा द्यायच्या असा दुटप्पीपणा प्रकार याच तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या शेंदाड शिपायाने केलाच होता हे तालुक्यातील जनता विसरलेली नाही. या शिपायाने आज पुन्हा विखे यांच्या दोऱ्यात आंदोलनाचा घाट घालून स्वता:ला मिरवून घेण्याचा प्रयत्न केला. एकीकडे लोकशाहीचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे लोकशाही मार्गाने आलेल्या राज्याच्या मंत्र्यांच्याच अंगावर धाकदडपशाही करुन धावून जायचे. हा निंद्य प्रकार महायुतीचे कार्यकर्ते कदापीही सहन करणार नाहीत.

संगमनेर शहरातील पाणी पुरवठा, रस्ते, इतर सुविधा यांच्या कामासाठी पालकमंत्र्यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठक सुरळीत पार पडली म्हणजे आपल्या नाकर्तेपणाचे पितळ उघडे पडणार हे लक्षात आलेल्या माजी आमदारांनी तथाकथीत आंदोलन जीवींना सुपारी देवून पाठविले हे सुद्धा लपून राहिलेले नाही. या सुपारी बहाद्दराला पद आणि प्रसंगाचे औचित्यही समजत नाही. कोणतेही इतर मंत्री दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेवू शकत नाही. तो अधिकार राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे आहेत. हे उघड असताना सुद्धा त्याबाबतचे निवेदनाचे निमित्त करुन महायुतीच्या बैठकीनंतर आंदोलन करण्याचा जाणिवपूर्वक घातलेला गोंधळ आणि निवेदन देण्यासाठी केलेला स्टंट याला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फक्त दूर करुन समज दिली.

मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उद्घोष सुपारीबाज आंदोलनजीवी करत आहेत. तातडीची प्रतिक्रीया देण्यासाठी त्यांना सुपारी देणारे आता त्यांचे आका ज्या तऱ्हेने पुढे आले त्यातून पराभव अजूनही पचला नसल्याचे स्पष्ट होते. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह आ.अमोल खताळ पाटील अशा खोटष्या आंदोलनजीवी सुपारीबाज व त्यांच्या आकांना भित नाही आणि किंमतही देत नाही.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवून पराभवानंतर गळा काढणाऱ्या माजी आमदारांना एवढीच आठवण करुन द्यावीशी वाटते की, ती म्हणजे संगमनेर जिल्हा होण्यासाठी एकाकी लढा देणाऱ्या आत्माराम देशमुख यांच्यावर पोलिस स्टेशनसमोर महिलांना सुपारी देवून हल्ला घडवणारे कार्यकर्ते कोणाचे होते. त्यावेळी सूद्धा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मुग गिळून गप्प होते. निषेध सोडाच पण आत्माराम देशमुखांवरच गुन्हा दाखल करायला लावला तेव्हा दडपशाही दहशत कोणाची हे तालुका ओळखून आहे. याच कारणामुळे तुम्ही माजी झालात हे लक्षात घ्या. सुपारीबाज आंदोलनजीवी आणि बायकोच्या नथीतून तीर मारणाऱ्या माजी आमदारांचा यामुळे आम्ही महायुती निषेध करीत आहोत असे म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात यांचा विरोधकांना सवाल

संगमनेर | नगर सह्याद्री दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या...

जीएसटी समितीच्या अहिल्यानगर शहर संयोजकपदी निखिल वारे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान...

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 40 जणांचा आक्षेप, वाचा, सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या अंतिम दिवसापर्यंत (15...