spot_img
अहमदनगरसंदीप थोरातचे दोन साथीदार गजाआड! 'क्लासिक ब्रीज' च्या नावाखाली कुणाला फसवले?

संदीप थोरातचे दोन साथीदार गजाआड! ‘क्लासिक ब्रीज’ च्या नावाखाली कुणाला फसवले?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री 
मासिक 15 टक्के परताव्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. नवनाथ सुभाष लांडगे (रा. देहरे, ता. नगर) व सचिन सुधाकर शेलार (रा. रेणुकानगर, एमआयडीसी) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल आहे.

फिर्यादी गोरख सिताराम वाघमारे (रा. पाथर्डी रस्ता, शेवगाव) यांनी सन 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत क्लासिक ब्रीज मनी सोल्युशन प्रा. लि. या संस्थेमध्ये गुंतवणूक केली होती. संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांना मासिक 15 टक्के परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. मात्र, ठरल्याप्रमाणे गुंतवणूक केलेली रक्कम व परतावा मिळाला नाही, तसेच शेवगाव येथील शाखा बंद झाली.

या आर्थिक फसवणुकीबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, विश्वास बेरड, फुरकान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, जालींदर माने, प्रशांत राठोड यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून गुन्ह्यातील नवनाथ लांडगे व सचिन शेलार यांना ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांना शेवगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून, पुढील तपास शेवगाव पोलीस करीत आहेत.

आतापर्यंत चौघांना अटक
गुंतवणुकीवर जास्तीचा परतावा देण्याच्या अमिषातून 23 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी क्लासीक ब्रीज मनी सोल्युशन प्रा. लि. या कंपनीच्या संदीप सुधाकर थोरात, दिपक रावसाहेब कराळे, अमोल सिताराम खरात, दिलीप तात्याभाऊ कोरडे, नवनाथ सुभाष लांडगे व सचिन सुधाकर शेलार अशा सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच संदीप थोरात व दिलीप कोरडे या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यानंतर नवनाथ लांडगे व सुचिन शेलार या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. आतापर्यंत चौघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून इतर फरार आरोपींचा पोलिस पथके शोध घेत आहेत.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर तर ‘ही’ आहेत सर्वोत्तम ठिकाणे

मुंबई । नगर सहयाद्री:- कडक उन्हाळ्यात बरेच जण बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असतात....

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! १०० आणि २०० च्या नव्या नोटा लॉन्च करणार!, जुन्या नोटा…

Reserve Bank Of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे. १००...

नशीब चमकणार! ‘या’ राशीसाठी आनंदाची बातमी, वाचा राशिभविष्य..

मुंबई । नगर सह्याद्री मेष राशी भविष्य तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर...

विना परवाना रस्ता खोदणे पडले महागात’; महापालिकेची मोठी कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री चितळे रस्त्यावर भराड गल्ली येथे महिनाभरापूव नव्याने करण्यात आलेला काँक्रिटचा रस्ता...