spot_img
अहमदनगरसंदीप थोरात याला सावेडीत ठोकल्या बेड्या!

संदीप थोरात याला सावेडीत ठोकल्या बेड्या!

spot_img

अखेर थोरातसह सहाजणांविरोधात शेवगाव पोलिसांनी केला गुन्हा | दिलीप कोरडेला घेतले ताब्यात | आरोपींच्या शोधार्थ पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने पथके केली रवाना

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
गुंतवणुकीवर जास्तीचा परतावा देण्याच्या अमिषातून 23 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी क्लासीकब्रीज मनी सोल्युशन प्रा. लि. या कंपनीच्या संदीप सुधाकर थोरात, दिपक रावसाहेब कराळ, अमोल सिताराम खरात, दिलीप तात्याभाउ कोरडे, नवनाथ सुभाष लांडगे व सचिन सुधाकर शेलार अशा सहाजणांच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती शेवगावचे पोलिस निरीक्षक समाधान नांगरे यांनी दिली. गोरख सिताराम वाघमारे रा. शेवगाव यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या संदीप थोरात याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांचा तातडीने शोध त्यांना अटक करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिल्यानंतर शेवगाव पोलिस अलर्ट झाले. पोलिस निरीक्षक समाधान नांगरे यांनी थोरात याच्या शोधार्थ एक टीम तयार केली. ही टीम सकाळीच नगरमध्ये दाखल झाली. मात्र, त्यांना संदीप थोरात मिळून येत नव्हता. सावेडी उपनगरात एका ठिकाणी तो असल्याची माहिती शोध पथकातील पोलिस कर्मचारी श्याम गुंजाळ यांना मिळाली. त्यानुसार शोध घेतला आणि शेवगाव पोलिसांच्या टीमने संदीप थोरात याला पाईपलाईन रस्त्यातच अटक करत बेड्या ठोकल्या. दरम्यान शेवगाव शाखेचा मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेला दिलीप कोरडे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्य आरोपींच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना झाली असून लवकरच त्यांनाही ताब्यात घेण्यात यश मिळेल असा आशावाद पोलिस निरीक्षक समाधान नांगरे यांनी व्यक्त केला.

गोरख वाघमारे यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की, जानेवारी 2024 मध्ये मला माझे मित्रांकडून समजले की, वरूर चैफुली, आखेगाव रोड, शेवगाव येथे क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन प्रा. लि. या संस्थेची शेअर मार्केटची शाखा सुरू झालेली असून ते गुंतवणूकीवर मासिक 15 टक्के व्याजदर देत आहेत. त्यानंतर 4 ते 5 दिवसांनी सदर संस्थेने त्यांचे संस्थेविषयी जाहीरात करण्याकामी पाम्पलेट छापून त्याच्या प्रति घरोघर वाटल्या होत्या त्याची एक प्रत माझे घराचे अंगनात मलाही प्राप्त झाली होती. तसेच सदर संस्थेने त्यांच्या गुंतवणूकीविषयी प्रसिध्दी केलेली सदर पाम्पलेट मी वाचून बघीतली असता त्यामध्ये गुंतवणूकीवर मासिक 15 टक्के परतावा देण्याबाबत छापले होते, त्यानंतर मी 3 ते 4 दिवसांनी वरूर चैफुली, आखेगाव रोड, येथे क्लासिक ब्रिज मनी सोल्युषन प्रा. लि. या संस्थेत चैकशीकामी गेलो. त्यावेळी सदर संस्थेत संदीप सुधाकर थोरात, दिपक रावसाहेब कराळे हे दोन संचालक व अमोल सिताराम खरात मुख्य कार्यकारी अधिकारी नाषिक, दिलीप तात्याभाऊ कोरडे शेवगाव येथील संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सदर संस्थेचे दोन कर्मचारी नवनाथ सुभाष लांडगे व सचिन सुधाकर शेलार हे सर्व हजर होते. त्या सर्वांनी मला त्यांच्या संस्थेची माहती दिली.

सदर संस्थेत आर्थिक गुंतवणूक केल्यास दरमहा 15 टक्के परतावा देण्याचे आश्वासन देवून त्यांच्या संस्थेत गुंतवणूक करण्यागस सांगितले तसेच सदर संस्थेत 6 महीने व 12 महीने मुदतीच्या दोन योजना असून तुम्ही स्यापैकी एका योजनेत गुंतवणूक करा असे सांगितले तसेच सदर संस्थेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही याची हमी यरील सर्वांनी मला दिली. तसेच गुंतवणूकीची हमी म्हणून आम्ही तुम्हाला रक्कम रुपये 1000/- घ्या स्टॅम्प पेपरयर नोटरी करून देतो असे सांगितले तसेच कंपनीचे शेअर्स सटफिकेट तसेच क्लासिक ब्रीज या संस्थेचा घेक देतो असे सांगितले तेव्हा मला त्यांच्यावर विश्यास वाटल्याने व कागदोपत्री विश्यास ठेवून मी दिनांक 12.1.2024 रोजी रक्कम रूपये 500000/- अक्षरी पाच लाख रूपये एक वर्षे मुदतीकरीता व मासिक 15 टक्के परतावा देण्याच्या अटीवर माझे आयडीबीआय बँकेचा चेक क्रमांक 184739 अन्वये आरटीजीएस व्दारे क्लासिक ब्रिज मनी सोल्युषन प्रा.लि. या संस्थेत गुंतवणूक केली होती.

त्यानंतर दि.2.2.2024 रोजी सहा महीन्याचे मुदतीच्या योजनेत 15 टक्के मासिक परतावा मिळण्याच्या अटीवर आयडीबीआय बँकेचा चेक क्रमांक 184741 अन्वये आरटीजीएस व्दारे क्लासिक ग्रीज मनी सोल्युषन प्रा.लि. या संस्थेत पुन्हा रक्कम रूपये 500000/- अक्षरी पाच लाख रूपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर दि. 16/3/2024 रोजी आयडीबीआय बँकेचा चेक क्रमांक 184744 अन्वये आरटीजीएस व्दारे क्लासिक ब्रीज मनी सोल्युषन प्रा.लि. या संस्थेत रक्कम रूपये 500000/- अक्षरी पाच लाख रूपयांची गुंतवणूक 6 महीने मुदतीकरीता मासिक 19 टक्के परतावा देण्याच्या अटीवर गुंतवणूक केली होती. तेव्हा मी केलेल्या गुंतवणूकीबाबत क्लासिक ब्रीज मनी सोल्युषन प्रा.लि. शेवगाव शाखा या संस्थेने गुंतवणूक केलेबाबत रक्कम रु.1000/- च्या स्टॅम्प पेप्रवर नोटरी वकीलामार्फत नोंदवून दिली त्या प्रमाणे सदर कंपनीचे शेअर सटफिकेट मला दिले होते तसेच माझे गुंतवणूकीची हमी म्हणून त्यांनी मला अक्सीस बँकेचे तीन चेक दिलेले होते.

मी केलेल्या गंतवणूकीवर क्लासिक ब्रीज मनी सोल्युषन प्रा. लि. या संस्थेने मला दि.31/2/2024 रोजी 15 दिवसांचा परतावा म्हणून रु.40000/- रूपये व दिनांक 1/3/2024 रोजी 10 लाख रूपये गुंतवणूकीचा 28. दिवसांचा परतावा म्हणून 140000/- रूपये व दिनांक 2/4/2024 रोजी 199900/- रूपये परतावा व दिनांक 2/5/2024 रोजी 15 लाख रूपयांचा परतावा म्हणून रु.245000/- असा एप्रिल 2024 पर्यंतचा परतावा मला मिळालेला आहे. त्यानंतर दिनांक 1/6/2024 रोजी माझा वाढदिवस व माझे पुस्तकाचे प्रकाशन लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय आखेगाव रोड, शेवगाव या ठिकाणी होते आणि तेथून अवघ्या काही अंतरावरच क्लासिक ब्रीज मनी सोल्युषन प्रा.लि. या संस्थेचे आ0फीस होते व मी कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे त्या दिवशी सदर संस्थेचे नवनाथ लांडगे व श्री. सचिन शेलार यांनी गुंतवणूकदार लोकांना परतावा देण्यात येणार आहे तरी तुम्ही संध्याकाळी 5/00 वाजता संस्थेत या असे सांगितले होते परंतू नंतर 3 ते 3.30 वाजताच्या दरम्यान सदर संस्थेवर जीएसटीची रेड पडली अशी सायंकाळी 5 वाजताचे सुमारास माहीती मिळाली तेव्हा मी सदर माहीतीची खात्री केली असता सदर संस्थेवर कोणत्याही प्रकारची जीएसटीची रेड पडली नसून लोकांचे गुंतवणूकीचे पैसे परत न करण्यासाठी सदर संस्थेचे लोकांनीच रेड झाल्याबाबत खोटी माहीती दिलेली होती.

सदर संस्थेत गुंतवणूक करणा-या लोकांनी मला सांगितले की, सदर दिवषी संस्थेमध्ये गाडी क्रमांक एम एच 16 बी वाय 9270 ही गाडी होती व त्या गाडीतून काही लोक खाली उतरून जीएसटी अधिकारी असल्याचे सांगत होते. व त्यांनी सदर संस्थेचे कार्यालय बंद केले. मी माझा कार्यक्रम संपल्यावर सायंकाळी 6/00 वाजता क्लासिक ब्रीज मनी सोल्युषन प्रा.लि. या संस्थेच्या शेवगाव शाखेत गेलो असता त्यावेळी सदर संस्थेचे शटरवर जीएसटीचे पत्रक चिटकाविलेले होते. त्या ठिकाणी बरेच लोक जमा झाले होते व त्यांची अपापसात चर्चाही चालू होती. तसेच क्लासिक ग्रीज या संस्थेने मला दि.18.6.2024 रोजी पत्र पाठवून दि.30 जुलै 2024 रोजी पहीला हप्ता मिळेल व दर महीन्याच्या 30 तारखेला 20 टक्के रक्कम मुददल मिळेल व परतावा रक्कमेचा नंतर विचार केला जाईल असे नमूद केले होते मात्र मला कोणत्याही प्रकारे पत्रात नमूद केल्याप्रमाणे रक्कम मिळालेली नाही. त्यानंतर सदर संस्थेचे संचालक श्री संदीप सुधाकर थोरात व दिपक कराळे यांनी आम्हाला बोलाविल्याने मी दिनांक 27/6/2024 रोजी सदर संस्थेत गुंतवणूक केलेल्या इतर लोकांसोबत नाषिक येथील त्यांच्या आफीसमध्ये गेलो होतो तथापी त्या ठिकाणी आम्हाला कोणीही भेटले नाही.

दि. 12 जानेवारी 2024 ते दि.24/2/2025 रोजी दरम्यान क्लासिक ग्रीज मनी सोल्युषन प्रा.लि. या संस्थेचे पदाधिकारी संदीप सुधाकर थोरात, दिपक रावसाहेब कराळे हे दोन संचालक व अमोल सिताराम खरात मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक, दिलीप तात्याभाउ कोरडे शेवगाव येथील संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सदर संस्थेचे कर्मचारी नवनाथ सुभाष लांडगे व सचिन सुधाकर शेलार यांनी मला गुंतवणूकीवर मासिक 15 टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून माझा विश्वास संपादन केला. मी वर नमूद संस्थत गंतविलेली उर्वरीत मुददल रक्कम 10 दहा लाख 50 हजार रूपये व एप्रिल 2024 पासून होणारा 15 व 19 टक्के मासिक दराने परतावा म्हणून होणारी रक्कम 12 लाख पन्नास हजार शंभर रुपये असे गुंतवणूक रक्कम व परतावा असे एकूण 23 लाख शंभर रूपयांची आर्थिक फसवणूक सदर संस्थेचे पदाधिकारी संदीप सुधाकर थोरात, दिपक रावसाहेब कराळे हे दोन संचालक व अमोल सिताराम खरात मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक, दिलीप तात्याभाउ कोरडे शेवगाव येथील संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सदर संस्थेचे कर्मचारी नवनाथ सुभाष लांडगे व सचिन सुधाकर शेलार यांनी केलेली असून माझेप्रमाणेच अजून ब-याच लोकांची आर्थिक फसवणूक त्यांनी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

गुन्ह्यांची व्याप्ती वाढणार अन्‌‍ फिर्यादी देखील!
संदीप थोरात याने वेेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली गुंतवणुकदारांना गंडा घालतानाच बेरोजगारांना देखील गंडा घातला. याशिवाय महिला देखील यात अकडल्या आहेत. नगर शहरासह जिल्ह्यात सह्याद्री मल्टीनिधी कंपनीचे मोठे जाळे निर्माण करत त्यातून देखील अनेकांना आर्थिक नुकसान त्याने पोसवले. याशिवाय अन्य कंपन्यांमधील गुंतवणूकदार देखील आता पोलिस अधीक्षकांना भेटत असल्याने त्याच्यावर गुन्ह्यांची मालिकाच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आरोपी संदीप थोरातसह सहाजणांवर लावली कलमे!
आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संदीप थोरात याच्यासह सहाजणांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अधिनियम 2023 च्या कलम 318 (4), 316 (2), 316 (5), 3 (5) आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम 1999 मधील कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‌‘नगर सह्याद्री‌’ची भूमिका खऱ्याखुऱ्या जागल्याची!
पतसंस्था, बँकांप्रमाणे आर्थिक व्यवहार करण्याचा कोणताही परवाना नसताना जास्तीचा परतावा देण्याच्या नावाखाली संदीप थोरात व त्याच्या टोळीने अनेकांना गंडवले. याबाबतची संपूर्ण माहिती ‌‘नगर सह्याद्री‌’च्या हाती आल्यानंतर याबाबत आम्ही सातत्याने लिखाण केले. फसवणूक झालेले गुंतवणूकदार पुढे आले. या संपूर्ण घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेत पोलिस अधीक्षक राकेश ओला व पोलिसांनी गंभीर दखल घेतली आणि थोरातसह त्याच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल झाला. खरेतर जास्तीच्या परताव्याचे अमिष अनेकांना भयंकर महागात पडले. याआधीही अशा घटना घडलेल्या असताना घामाची पुंजी अनेकांनी यात अडकवली आणि थोरात व त्याच्या टोळीने त्यावर डल्ला मारला. या संपूर्ण प्रकरणात न्याय मिळवून देण्याची भूमिका आम्ही घेतली. संदीप थोरात याच्याशी आमची व्यक्तीगत कोणतीही दुष्मणकी नव्हती आणि नाही! मात्र, त्याच्यातील अपप्रवृत्तीला आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न केला. गुंतवणुकदारांनी काळजी घेऊन आपली गुंतवणूक करावी आणि फसवणूक टाळावी. या संपूर्ण प्रकरणात आम्ही जागल्याची भूमिका घेतली आणि घेत राहणार हा आमचा सर्वांना शब्द! फसवणूक झालेल्यांनी पुढे यावे आणि पोलिसात तक्रार द्यावी. पोलिस अधीक्षक राकेश ओला व त्यांची टीम नक्कीच त्याची दखल घेतील! ‌‘नगर सह्याद्री‌’ची टीम सोबत आहेच!
– शिवाजी शिर्के, संपादक, दैनिक नगर सह्याद्री

फोन पे वर पाठवला 45 हजारांचा परतावा!
फिर्यादीने त्यात म्हटले आहे की, क्लासिक ब्रीज मनी सोल्युषन प्रा.लि. या संस्थेकडून मला माझी मुददल रक्कम व परतावा मिळत नसल्याने मी सदर संस्था व त्यांचे पदाधिकारी यांचेविरोधात नाशिक येथील आयुक्त कार्यालय, नाशिक रोड, आमची फसवणूक झाली असल्याचा अर्ज साडेसात वाजता दाखल केला व पोहच घेतली. त्यानंतर दि.6 ऑगस्ट 2024 रोजी मला वर नमूद संस्थेकडून माझे 15 लाख रूपये गुंतवणूकीवर 3 टक्के दराने परतावा म्हणून 45 हजार रूपये फोन पे व्दारे देण्यात आले.

क्लासीकब्रीजने गाशा गुंडाळल अन्‌‍ परताव्याचे चेकही बाऊन्स झाले!
क्लासिक ब्रीज मनी सोल्युषन प्रा.लि. या संस्थेकडून आम्हाला गुंतवणूक रक्कम दिली नाही अगर कोणताही परतावा दिलेला नाही. तसेच त्यांच्या चापडगाव ता. शेवगाव, व ढोरजळगाव ता. शेवगाव व पैठण जिल्हा छ. संभाजीनगर या ठिकाणीदेखील अशाप्रकारच्या शाखा उघडलेल्या होत्या, त्या शाखाही बंद असून मला दिलेले अक्सीस बँकेच्या एक चेकची मुदत संपलेली असून सदर संस्थेच्या बँक खात्यावर रक्कम शिल्लक नसल्याने मी उर्वरीत दोन चेक दि.24/2/2025 रोजी भरले असता पेमेंट स्टॉपच्या मेमोसह पत्र बँकेने दिलेले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भीषण अपघात महिला ठार, कुठे घडली घटना?

Accident News: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बांबळेवाडी येथे मालवाहू टेम्पो आणि कारची धडक होऊन झालेल्या...

माळीवाडा परिसरात तरुणावर कोयत्याने सपासप वार!

अहिल्यानगर नगर सहयाद्री:- नगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आता...

खळबळजनक! नदीच्या पुलाखाली पोत्यात मृतदेह आढळला

Crime News : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. निरा नदीच्या...

अहिल्यानगर शिवसेना शहर प्रमुख पदाची जबाबदारी किरण काळे यांच्या खांद्यावर ; काळे म्हणाले… भैय्यांची इच्छा पूर्ण करणार…

  स्व. अनिलभैय्या राठोड यांची इच्छा पूर्ण झाली - काळे मुंबई / नगर सह्याद्री : शिवसेना ठाकरे...