spot_img
अहमदनगरसर्वसामान्य माणसाचा केसानं गळा कापणाऱ्या संदीप थोरातला 'इतक्या' दिवसांची पोलीस कोठडी!

सर्वसामान्य माणसाचा केसानं गळा कापणाऱ्या संदीप थोरातला ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी!

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जादा परताव्याच्या अमिषाने वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या टोळीचा मास्टरमाईड संदीप थोरातसह त्याच्या साथीदाराला शेवगाव पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले होते. दरम्यान, संदीप थोरातसह त्याच्या साथीदाराला जिल्हा सत्र न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी गोरख सिताराम वाघमारे (रा. शेवगाव ) यांनी फिर्याद दाखल केली होती. 

सन २०१८ ते २०२३ च्या कालखंडात या नगर शहरांमध्ये मोठ मोठे होर्डिंग लागल्याचं तुम्ही पाहिलं असेल. या मोठ मोठ्या होर्डिंग्जवर फायनान्स कंपन्यांच्या जाहिरातीही तुम्ही पाहिल्याच असतील. त्या जाहिराती पाहून तुमच्यापैकी अनेकांनी याच्या निधी / फायनान्स कंपन्यांमध्ये आर्थिक गुंतवणूकही केली असेल. नगर तालुक्यातल्या रांजणी माथणी या छोट्याशा गावातल्या संदीप थोरात या धूर्त आणि बोल घेवड्या इसमाने सामान्य लोकांना विश्वासात घेऊन त्यांचा अक्षरश: केसानं गळा कापला.

संदीप थोरात याने गंडविणाऱ्या कंपन्यांची एक फॅक्टरीच चालू केली होती. त्याच्या या फॅक्टरीतील पहिली कंपनी होती ती सह्याद्री मल्टीनिधी प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून त्याने नगर शहरासह नगर तालुक्यातील अनेकांना गंडविले. अनेक कंपऱ्यांच्या माध्यमातून सुसाट सुटलेल्या संदीप थोरातसह त्याच्या साथीदाराने फिर्यादी गोरख सिताराम वाघमारे यांची 23 लाख शंभर रूपयांची आर्थिक फसवणूक केली.

याप्रकरणी क्लासीकब्रीज मनी सोल्युशन प्रा. लि. या कंपनीच्या संदीप सुधाकर थोरात, दिपक रावसाहेब कराळ, अमोल सिताराम खरात, दिलीप तात्याभाउ कोरडे, नवनाथ सुभाष लांडगे व सचिन सुधाकर शेलार अशा सहाजणांच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच संदीप थोरात पुण्याच्या दिशेने निघाला होता.

पुण्याकडे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरली. सुपा पोलिसांना संदीप थोरातबाबत माहिती देण्यात आली. सुपा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे व त्यांच्या टीमने थोरात याला ताब्यात घेतले होते. दरम्यान, आता संदीप थोरातसह त्याच्या साथीदाराला जिल्हा सत्र न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

20 कोटी मिळवून देण्याच्या नावाखाली 50 लाखांना चुना!

जयंत कंठाळे, सागर ऊर्णे, योगेश घुले, गणेश शिंदे यांच्या विरोधात कोतवालीत गुन्हा अहिल्यानगर | नगर...

भिकारी सरकार! कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त विधान

रमी व्हिडीओनंतर पत्रकार परिषदेत सरकारलाच ठरवले 'भिकारी', विरोधक आक्रमक नाशिक | नगर सहयाद्री:- राज्याचे कृषीमंत्री...

एमआयडीसीत भयंकर प्रकार; धारदार कोयत्याने हल्ला..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री गजराजनगर, काळा माथा परिसरात जुन्या वादातून सात जणांनी मिळून एका व्यक्तीवर...

सरपंच पदासाठी बुधवारी, गुरुवारी आरक्षण सोडत; वाचा सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- गाव पातळीवरील राजकारणात महत्त्वपूर्ण असणाऱ्या सरपंच पदाचे आरक्षण आता पुन्हा एकदा...