न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय
सह्याद्रीचे मल्टीनिधीचे ठेवीदार पोलिसांत
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
गुंतवणुकीवर जास्तीचा परतावा देण्याच्या अमिषातून 23 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी क्लासीकब्रीज मनी सोल्युशन प्रा. लि. या कंपनीच्या संदीप सुधाकर थोरात याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान मनीमॅक्स फायनान्सीअल ॲडव्हायझर प्रा. लि. ही कंपनी कंपनीच्या माध्यमातून जादा परतावा देण्याचे अमिष दाखवत संदीप थोरात सह त्याच्या टोळीवर सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. थोरातला आज न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 26 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान सह्याद्री मल्टीनिधीच्या ठेवीदारांनी सुपा पोलिसांत धाव घेतली आहे.
गुंतवणुकीवर जास्तीचा परतावा देण्याच्या अमिषातून 23 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी क्लासीकब्रीज मनी सोल्युशन प्रा. लि. या कंपनीच्या संदीप सुधाकर थोरात या दिपक रावसाहेब कराळ, अमोल सिताराम खरात, दिलीप तात्याभाउ कोरडे, नवनाथ सुभाष लांडगे व सचिन सुधाकर शेलार अशा सहाजणांच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संदीप थोरात सह शेवगाव शाखेचा मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेला दिलीप कोरडे याला ताब्यात घेतले. त्यानंतर आणखी दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
दरम्यान, मनीमॅक्स फायनान्सीअल ॲडव्हायझर प्रा. लि. ही कंपनी कंपनीच्या माध्यमातून जादा परतावा देण्याचे अमिष दाखवत संदीप थोरात आणि त्याच्या टोळीने सुपा (पारनेर) येथील कार्यालयातून जवळपास साडेआठ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. फसवणूक झालेल्या गुंतवणूक दारांची यादीच समोर आली. याबाबत सुपा पोलिस ठाण्यात संदीप थोरात व त्याच्या टोळीविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप थोरात यास आज न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयाने 26 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सह्याद्री मल्टीस्टेच्या ठेवीदारांनी घेतला गुन्हा दाखल करण्याचा निर्णय
क्लासीकब्रीज मनी सोल्युशन प्रा. लि. व मनीमॅक्स फायनान्सीअल ॲडव्हायझर प्रा. लि. या कंपन्यांच्या माध्यमातून संदीप थोरात व त्याच्या टीमने अनेकांना गंडा घातल्याचे समोर आल्याने त्याच्यावर शेवगाव व सुपा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच सह्याद्री मल्टीनिधी या संस्थेच्या माध्यमातूनही त्याने अनेकांना गंडा घातल्याचे समोर येत आहे. अनेकांच्या ठेवी अडकल्या असल्याचे सांगितले जात आहे. सह्याद्री मल्टीनिधी च्या नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शाखा स्थापण करण्यात आल्या होत्या. संस्थेचे मोठे जाळे नगर तालुक्यात उभारले होते. परंतु आता ठेवीदारांच्या ठेवी मिळत नसल्याचे वास्तव आहे. दरम्यान शेवगाव व सुपा येथे संदीप थोरातवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असल्याने आता सह्याद्री मल्टीनिधीचे ठेवीदारांनीही सुपा पोलिसांत धाव घेतली. पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान दिवटे यांनी ठेवीदारांचे म्हणणे ऐकूण घेतले. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सह्याद्री मल्टीस्टेच्या ठेवीदारांनी नगर तालुक्यातील शाखांमध्ये पैसे गुतवले असल्याने संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतच गुन्हा दाखल करता येईल असे संबंधित ठेवीदार यांना सुपा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान दिवटे यांनी सांगितले.