spot_img
अहमदनगर‌‘मनीमॅक्स‌’ च्या नावाखाली संदीपने घातला साडेआठ कोटींना गंडा!

‌‘मनीमॅक्स‌’ च्या नावाखाली संदीपने घातला साडेआठ कोटींना गंडा!

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री:-
मनीमॅक्स फायनान्सीअल ॲडव्हायझर प्रा. लि. ही कंपनी कंपनीच्या माध्यमातून जादा परतावा देण्याचे अमिष दाखवत संदीप थोरात आणि त्याच्या टोळीने सुपा (पारनेर) येथील कार्यालयातून जवळपास साडेआठ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूक दारांची यादीच समोर आली असून याबाबत सुपा पोलिस ठाण्यात संदीप थोरात व त्याच्या टोळीविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल असलेल्या आरोपींच्या शोधार्थ सुपा पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक समाधान दिवटे यांनी दिली.

सुपा (पारनेर) येथील गुंतणूकदारांनी 17 फेब्रुवारी 2025 रोजी संदीप थोरात याच्यासह त्याच्या घोटाळेबाज सहकाऱ्यांची यादी, केलेली गुंतवणूक आणि झालेली फसवणूक याचे आकडेच पोलिस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात सादर केले. संदीप थोरात याच्या घोटाळ्यांची माहिती आणि अर्ज मोठ्या प्रमाणात समोर आल्याने अतिरीक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी सुपा येथील गुंतवणूकदारांच्या तक्रारीची शहानीशा करत संदीप थोरात व त्याच्या घोटाळेबाज टीमवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता सुपा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना आदेश प्राप्त होताच गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादीत म्हटले आहे की, सुपा येथे मार्च 2024 मध्ये क्लासिक ब्रिज मनी सोलुशन प्रा.लि. या नावाने कंपनीने शेअर्स विक्री चालु केलेली होती. जुलै 2024 मध्ये सदर कंपनीचे नाव मनी मॅक्स फायनानसीयल ॲडव्हायजर प्रा. लि. असे कंपनीचे नाव केले. त्या कंपनीचे मुख्य कार्यालय प्लॉट नं. 2, ऑफीस 606, सेक्टर 19-डी. वाशी (नवी मुंबई) येथे आहे. त्यावेळेस आंम्ही सदर कंपनीचे मॅनेजर महेश बाबासाहेब काळे याने आम्हाला त्यासंदर्भा पुर्ण माहिती दिली.

त्यानंतर कंपनीचे मालक संदीप थोरात, संचालक विश्वास विजय पाटोळे, सीईओ असलेले आमोद व्यास या सर्वांची भेट करून दिली व त्यांनी आंम्हाला शेअर्सची माहिती दिली. तुम्ही जेवढे पैसे भरताल त्याबदल्यात तुम्हाला प्रति महा 12 ते 15 टक्क्‌‍याने त्याचा परतावा मिळेल असे सांगीतले. त्यानुसार आम्ही 42 लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, आजपर्यंत आम्हाला एक रुपयाचाही परतावा मिळाला नसल्याचे त्या फिर्यादीत म्हटले आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल असून आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी दिली.

मनीमॅक्सच्या माध्यमातून गंडविणाऱ्या टोळीतील हे आहेत आरोपी!
सुपा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात संदीप सुधाकर थोरात, त्याची पत्नी, आमोद व्यास, विश्वास विजय पाटोळे, महेश बाबासाहेब काळे, मोहीत रासने, शिवानी सांगळे, नामदवे नंदलाल पवार यांना आरोपी करण्यात आले आहे.

शिवानी सांगळे नवीमुंबईत बसून घालायची गंडा!
सुपा येथील गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव समोर आलेली शिवानी सांगळे ही मुळची एमआयडीसी परिसरात राहणारी! संदीप थोरात याच्याकडे काम करत असताना संदीप याने वाशी (नवी मुंबई) येथे कार्यालय सुरु केले आणि त्या कार्यालयाच्या प्रमुखाची सुत्रे त्याने शिवानी सांगळे हीच्याकडे दिली. दरम्यान, शिवानी सांगळे हीने संदीप थोरात याच्यासोबत अनेकदा दिल्लीसह देशभरात विमान प्रवास केल्याचेही समोर आले आहे.

सहा दिवसांची पोलीस कोठडी
शेवगाव पोलीसांत दाखल झालेल्या गुन्ह्यात जादा परताव्याच्या अमिषाने वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या टोळीचा मास्टरमाईड संदीप थोरातसह त्याच्या साथीदाराला शेवगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, संदीप थोरातसह त्याच्या साथीदाराला जिल्हा सत्र न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी गोरख सिताराम वाघमारे (रा. शेवगाव) यांनी फिर्याद दाखल केली होती. इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके मागावर आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पळसपूरात गावठी दारू अड्डयावर धाडसत्र ! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांना अटक

  स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पारनेर / नगर सह्याद्री- तालुक्यातील पळसपूर शिवारातील निर्जन गायरानात सुरू असलेल्या अवैध...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे रविवारी अनावरण; कोण कोण राहणार उपस्थित पहा

मार्केट यार्ड चौक येथे महानगरपालिकेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन / कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या मार्गात...

भयंकर! चालत्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये पेशंटवर अत्याचार, कुठे घडला प्रकार पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे आली. होमगार्डच्या भरतीसाठी...

लाडकी बहीण योजनेबद्दल अजितदादांकडून मोठी अपडेट; ‘त्या’ महिलांसह पुरुषांना बसणार झटका!

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे,...