spot_img
ब्रेकिंगलष्कराच्या हद्दीतील वाळू तस्करी महागात पडली; अधिकाऱ्यांनी पकडला डंपर

लष्कराच्या हद्दीतील वाळू तस्करी महागात पडली; अधिकाऱ्यांनी पकडला डंपर

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
नांदगाव शिवारातील लष्कराच्या के. के. रेंज हद्दीतून अवैध वाळूची वाहतुक करत असलेला डंपर लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पकडला. दरम्यान, डंपर पकडताच चालक घटनास्थळावरून पसार झाला.

लष्कराचे रिसेलदार मेजर जितेंदर जगवीर सिंग (वय ४६रा. अपर कॅम्प, के. के. रेंज, खारेकर्जुने, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. सदरची घटना ४ जून रोजी रात्री ८ वाजता घडली असून गुन्हा ५ जून रोजी दुपारी दाखल झाला आहे. १० लाख रूपये किमतीचा विना नंबरचा डंपर पोलिसांनी जप्त केला आहे.

४ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नांदगाव शिवारातील के. के. रेंजच्या हद्दीत एका डंपरमधून अवैध वाळू वाहतुक होत असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या लक्ष्यात आले. त्यांना पाहून डंपर चालकाने डंपरमधील वाळू खाली करून घटनास्थळावरून डंपर सोडून पळ काढला.

लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सदरचा डंपर ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलीस अंमलदार थोरात अधिक तपास करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसामुळे नुकसान झालेल्या केडगाव अमरधाम, आंबेडकर भवनाची आयुक्तांकडून पाहणी

पडलेल्या भिंती बांधण्याचे काम तत्काळ सुरू करा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर ।...

मनपा, झेडपी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले!, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेकडून जोर बैठका..

सुनील चोभे | नगर सह्याद्री आगामी दोन-तीन महिन्यांत होऊ घातलेल्या महापालिका, नगर पंचायती, नगर परिषदा,...

ठाकरे ब्रँड बुडाला! आदित्य ठाकरेंचा पावसाळा आता कारागृहात?; मंत्री नितेश राणेंचे खळबळजनक वक्तव्य…

Politics News: राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून...

शहरासह जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी; शांतता व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) शनिवारी...