spot_img
ब्रेकिंगराहुल पाटलांवर टीका करणाऱ्या वाळूतस्कराने स्वतःची उंची तपासावी; मुंगसे यांचे पठारे यांच्या...

राहुल पाटलांवर टीका करणाऱ्या वाळूतस्कराने स्वतःची उंची तपासावी; मुंगसे यांचे पठारे यांच्या टिकेला प्रत्युत्तर

spot_img

सुपा । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुका भाजपचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्यावर टीका करणाऱ्या वाळूतस्कराने स्वतःची उंची तपासण्याची गरज आहे. ज्या नेत्यांची बाजू मांडत आहे, त्यांनी पैसा कसा कमावला, हे संपूर्ण पारनेर तालुक्याला माहित आहे. अशा शब्दात भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मनोज मुंगसे यांनी खा. नीलेश लंके यांचे समर्थक वाळवणे गावचे सचिन पठारे यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले.

राहुल पाटील शिंदे यांनी गेल्या वीस वर्षांपासून सुपा आणि परिसरात गोरगरीब जनतेची निस्वार्थ सेवा केली. शेतकरी, दूध उत्पादक आणि सामान्य लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. त्यांच्या आजोबांपासून ते वडिलांपर्यंत, शिंदे कुटुंबाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून तालुक्यात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. राहुल पाटील शिंदे यांनी नेहमीच सामान्य माणसाला मदत करण्याला प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राहुल पाटलांचे ताठ मानेने राजकारण
राहुल पाटील शिंदे हे शेती आणि कष्टातून पैसा कमावतात. त्यांना चोरी किंवा लबाडीने पैसे कमावण्याची गरज नाही. स्वाभिमानाने आणि ताठ मानेने राजकारण करणारे राहुल पाटील शिंदे हे गोरगरीबांचे खरे नेते आहेत. वाळू तस्करांनी त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून स्वतःची पातळी दाखवली आहे, त्यांनी स्वतःची उंची आधी तपासावी असेही मुंगसे म्हणाले.

राहुल पाटलांवर पाठांतर करून टीका
ज्या व्यक्तीला नीट भाषणही करता येत नाही, त्याने राहुल पाटील शिंदे यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही. त्यांनी पाठांतर करून टीका केली असावी, कारण त्यांच्याकडे स्वतःचे ज्ञान नाही. वाळू तस्करीतून पैसा कमावणाऱ्यानी कधी गोरगरीब जनतेची सेवा केली आहे का? त्यांनी कमावलेल्या पैशातून सामान्य लोकांसाठी काय योगदान दिले? असा सवाल मनोज मुंगसे यांनी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘यांचासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी बलिदान देण्यास तयार; माजी मंत्री थोरात यांचे मोठे वक्तव्य

अहिल्यानगर । नगर सहयाद्री संगमनेरमधील एका कीर्तनातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर करण्यात...

…हे तर संगमनेरला बदनाम करण्याचे षडयंत्र; आमदार सत्यजीत तांबे मामा थोरातांबरोबर मैदानात

संगमनेर । नगर सहयाद्री संगमनेरमधील कीर्तनात झालेल्या राजकीय गोंधळानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तापल्या आहेत. संग्रामबापू...

ह.भ.प. संग्रामबापू भंडारे महाराजांना पोलीस संरक्षण द्या; भाजपच्या शिष्टमंडळाची मागणी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री समाज प्रबोधनकार हभप संग्रामबापू भंडारे महाराज यांच्यावर घुलेवाडी गावातील काँग्रेस समर्थक...

करण ठुबे याने नीटमध्ये उज्वल यश मिळवून कुटुंब, गाव, पारनेर पब्लिक स्कूलचे नाव उंचावले

नीटमध्ये यश मिळाल्याबद्दल मित्र परिवार व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार सुपा | नगर सह्याद्री करण दादाभाऊ...