spot_img
महाराष्ट्रपारनेरमधील वाळू तस्कराला बेड्या! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पारनेरमधील वाळू तस्कराला बेड्या! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री
पारनेर तालुक्यातील खडकवाडी परिसरातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईत १५ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव रोहित शाहूराज साळवे (वय २६, रा. कासारे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे खडकवाडी परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. संशयित रोहित साळवे याच्याकडून अवैध वाळूने भरलेला डंपर जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान, साळवे याने अमोल रक्टे (पूर्ण नाव माहित नाही, फरार) आणि डंपर मालक बापू बोरूडे यांची नावे उघड केली. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संदीप दरंदले, विशाल तनपुरे, रमीज आत्तार आणि मनोज लातुरकर यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

अवैध वाळू वाहतुकीमुळे पर्यावरणाला होणारे नुकसान आणि स्थानिक प्रशासनाला बसणारा आर्थिक फटका लक्षात घेता, अशा कारवायांना गती देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.पारनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक हा गंभीर समस्या बनला आहे. यापूर्वीही अशा कारवाया झाल्या असून, प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. पुढील तपास पारनेर पोलीस करत असून, फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जनता दरबारात तक्रारींचा पाऊस; आमदार काशिनाथ दाते आक्रमक, म्हणाले…

आमदार काशीनाथ दाते | तक्रारींचा पाऊस | तातडीने निराकारण करण्याचे आश्वासन पारनेर | नगर सह्याद्री:- पारनेर...

सावधान! जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट, कुठे काय परिस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान...

भोकला म्हणून कुत्र्याला बेदम मारहाण, मारहाणीत मृत्यू, पुढे घडले भयंकर…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- रस्त्याने जाताना कुत्रा भुंकल्याने चिडलेल्या व्यक्तीने झाडाच्या फांदीने त्याला बेदम झोडपले....

… तर पै. शिवराज राक्षेवरील बंदी मागे घेऊ; कुस्तीगीर परिषद

पुणे | नगर सह्याद्री:- अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती 2025 या स्पर्धेमध्ये पै. शिवराज राक्षेने...