१५ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर । नगर सहयाद्री
अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळू माफियाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाईचा बगडा उगारला आहे. खडकवाडी (ता. पारनेर) येथे मोठी कारवाई करत 15 लाख रुपये किमतीची टाटा कंपनीचा ढम्पर तसेच 40 हजार रुपये किमतीची 4 ब्रास वाळु जप्त केली आहे. तसेच वाळू माफिया सुनिल बबन केदार (वय 30, रा. खडकवाडी, ता. पारनेर) यास अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेले पथकअवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करुन वाहतुक करणाऱ्या इसमांची माहिती काढत होते. दरम्यान पथकाला वाळू माफिया सुनिल बबन केदार खडकवाडी कडुन टाकळी ढोकेश्वरकडे जाणाऱ्या रोडने विना नंबरच्या ढम्परने अवैधरित्या वाळु वाहतुक करत असल्याची माहिती मिळाली.
पथकाने सापळा रचत वाळू माफिया सुनिल बबन केदार यास अटक केली. तपासणी करताना ट्रकच्या मागील हौदामध्ये वाळू भरलेली आढळली. या कारवाईत पोलिसांनी १५ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचा पथकातील पोउपनि/ समीर अभंग व पोलीस अंमलदार संतोष खैरे, गणेश लोंढे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, योगेश कर्डीले चालक अरुण मोरे यांनी बजावली आहे.



