spot_img
ब्रेकिंग'लॉरेन्स बिश्नोईनेच्या धमकीवर सलमान खान मनातलं बोलला'

‘लॉरेन्स बिश्नोईनेच्या धमकीवर सलमान खान मनातलं बोलला’

spot_img

Salman Khan: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या वांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर हल्ला झाल्याच्या घटनेनंतर सलमान खानने पोलिसांना आपली भावना व्यक्त केली आहे. सलमान खानच्या निवासस्थानी १४ एप्रिल रोजी दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केला होता, ज्यामुळे खळबळ उडाली होती.

मुंबई गुन्हे शाखेने सलमान खानचा जबाब नोंदवला असून, इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, लॉरेन्स बिश्नोईनेच मला आणि माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे मला वाटत आहे, असं सलमान खानने पोलिसांना सांगितले आहे. पूर्वीही सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खानचा जबाब नोंदवण्यात आला होता.

मुंबईतील विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. न्यायालयाने सांगितले की, सलमान खानच्या घरावर वांद्रे येथे झालेल्या हल्ल्याचे पुरावे पुरेसे आहेत. या आरोपींवर इतरही अनेक गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दोन आरोपींना मंदिरातून अटक केली होती. आरोपींनी सर्वप्रथम सलमान खानच्या पनवेलमधील फार्महाउसची पाहणी केली होती आणि त्यानंतर महिनाभर गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर लक्ष ठेवले होते. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या प्रकरणाची अधिक तपासणी सुरु असून, आरोपींना न्यायालयात आणण्याचे प्रयत्न जोरात सुरु आहेत. सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांनी विशेष सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...