मुंबई । नगर सहयाद्री:-
सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं शत्रू मालमत्ता म्हणून घोषित केल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयाचा 25 वर्षांपूवचा निर्णय रद्द करत प्रकरणाची नव्यानं सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
यामुळे सैफ अली खान याच्या मालकीच्या अनेक मालमत्ता आता सरकारकडं जाणार आहेत. या मालमत्तेत फ्लॅग स्टाफ हाऊस, नूर-उस-सबा पॅलेस, दार-उस-सलाम, हबीबी का बंगला, अहमदाबाद पॅलेस आणि कोहेफिजा प्रॉपट यांचा समावेश आहे.
उच्च न्यायालयानं सैफ अली खान याच्या 15000 कोटींच्या मालमत्तेशी संबंधित प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ट्रायल कोर्टानं एका वर्षाच्या आत कार्यवाही पूर्ण करावी, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.