spot_img
ब्रेकिंगशरद पवारांबाबत सदाभाऊ खोत यांचे वादग्रस्त वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा...

शरद पवारांबाबत सदाभाऊ खोत यांचे वादग्रस्त वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा…

spot_img

पुणे | नगर सह्याद्री
विधानसभा निवडणूक तोंडावर असताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आपल्या वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांची पुण्यातील होणारी पत्रकार परिषद उधळून लावणार असल्याचा इशारा दिला आहे. सांगलीमधील जत येथे भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारसभेमध्ये बोलताना सदाभाऊ खोत यांनी पवारांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आक्रमक झाले असून त्यांनी खोत यांना फोन लावत त्यांचा चांगलंच खडसावलं.

मी फोन केला आणि त्यांना म्हटलं की तुम्ही केलेलं वक्तव्य आम्हाला आवडलेलं नाही. हे तुम्ही बंद करा, अशा पद्धतीने वैयक्तिक कोणाबद्दल बोलणं हे आपली पद्धत नाहीये, त्याबद्दल आम्ही निषेध केलेला आहे. शरद पवार साहेबांबद्दल असं पुन्हा घडता कामा नये. कोणीच कोणाबद्दल बोललं नाही पाहिजे, तुम्हाला तुमची भूमिका मांडायची ती मांडा, तुमची विचारधारा वेगळी असू शकते पण मतमतांतर असताना ताळमेळ असला पाहिजे. हा अतिशय निंदनीय असून विनाशकालीन विपरीत बुद्धी त्यातला प्रकार आहे. त्यांनी सांगितलं आहे पुन्हा असं काही होणार नाही. मी त्यांना सांगितलं, तुम्ही जे काही बोललेला आहात ते चुकीचं आहे. अशा पद्धतीने बोलून नवीन काही प्रश्न निर्माण करू नका, वडिलधारी लोकांबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य महाराष्ट्र सहन करत नाही, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी रात्री उशिरा आधी ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी, पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं.
दरम्यान, सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पुण्यात पाहायला मिळाले. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी खोतांच्या पोस्टरला जोडे मारत मूर्दाबादच्या घोषणा दिल्या. सदाभाऊ खोत यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे.

सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा
राज्यात विधानसभा निवडणूका असल्याने सध्या प्रचाराला वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यादरम्यान भाजप नेते सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका करताना जीभ घसरली. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खोत यांचा समाचार घेतला असून सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा आहे. असं म्हणत भाजप पक्षावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?
जत (जि. सांगली) येथील प्रचार सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबाबत खालच्या भाषेत वक्तव्य केले होते. त्यांनी यावेळी एकेरी भाषेचा वापर केला होता. यामुळे वादाला तोंड फुटले. पवारसाहेबांच्या चिल्ल्यापिल्ल्यांनी कारखाने हाणले, बँका, सूत गिरण्या हाणल्या. आता म्हणतायेत की, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय, कसला चेहरा? तुम्हाला तुमच्या चेहर्‍यासारखा पाहिजे का? अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी पवारांवर टीका केली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शरद पवार यांचे प्राजक्त तनपुरेंबाबत महत्वाचे विधान, नेमकं काय म्हणाले पहा…

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ वांबोरी येथे जाहीर सभा राहुरी | नगर सह्याद्री फोडाफोडीमुळे लोकसभेत...

पारनेरच्या राजकारणात ट्विस्ट; सुजित झावरे किंगमेकरच्या भूमिकेत!, काय घडलं पहा…

पारनेर | नगर सह्याद्री- विधानसभेच्या पारनेर मतदारसंघात अजित पवार यांच्या आदेशाने उमेदवारी मागे घेतलेले...

निमगावकरांची खासदार निलेश लंकेंना चपराक!

संदेश कार्लेंचे फटायांच्या आतषबाजीत जंगी स्वागत पारनेर | नगर सह्याद्री गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार निलेश लंके...

विजयराव मैदानात: जिंकण्यासाठी नव्हे पाडण्यासाठी; पण कोणाला?; कोणी दिली सुपारी..!

बाजार समिती निवडणुकीत केलेली चूक विजय औटी यांना भोवली | रामदास भोसले हे पारनेरची...