spot_img
महाराष्ट्रसचिन तेंडुलकरची मुलगीही डीपफेकची शिकार, सारा व शुबमन गिल यांचे 'तसले' फोटो...

सचिन तेंडुलकरची मुलगीही डीपफेकची शिकार, सारा व शुबमन गिल यांचे ‘तसले’ फोटो व्हायरल

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री
सध्या डीपफेक, मॉर्फ फोटो आदी गोष्टी चर्चेत आल्या आहेत. याचे कारण म्हणजे अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचे व्हायरल झालेले ‘तसले’ व्हिडीओ. आता या गोष्टीची शिकार सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर देखील झाली आहे.

डीपफेक टेक्नॉलॉजीचा फटका साराला बसला आहे. सध्या सारा तेंडुलकर आणि क्रिकेटर शुबमन गिल यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामध्ये ते दोघेही एकत्र दिसत आहेत. फोटोसाठी पोझ देताना सारा शुभमन गिलला मिठी मारतेय असा तो फोटो आहे.

सध्या सारा आणि शुबमन यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच हा फोटो समोर आल्याने चर्चांना उधाण आलय.सारा आणि शुभमनच्या त्या फोटोत काहीही तथ्य नाही. हा मूळ फोटो नसून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मॉर्फ करण्यात आला आहे.

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचे मॉर्फ केलेले फोटो गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला आणि लोकांना वाटले की सारा आणि शुभमनने आपले नाते अधिकृत केले आहे. पण एआय डीप फेकच्या माध्यमातून हे चित्र तयार करण्यात आले आहे.

साराचा हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून घेण्यात आला असून सारासोबत बसलेली व्यक्ती शुभमन नसून तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर आहे. 24 सप्टेंबर रोजी साराने तिचा भाऊ अर्जुनसोबतचा हा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. अवघ्या एक महिन्यानंतर ते एडिट करून ट्विटरवर व्हायरल करण्यात आले. मूळ फोटोमध्ये अर्जुन तेंडुलकर खुर्चीवर बसला आहे आणि सारा आपल्या भावाला प्रेमाने मिठी मारत आहे. या फोटोमध्ये अर्जुनच्या चेहऱ्यावर शुभमनचा चेहरा लावण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान खात्यावर वर्ग

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिवृष्टी आणि पूर यामुळे दिनांक ०१ जून ते सप्टेंबर २०२५ या...

मनपाची मनमानी थांबवा, त्यावर नागरिकांचा संताप, खासदार लंके म्हणाले…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आकारणी प्रक्रियेतील अनियमितता, अस्पष्टता आणि नियमभंगाविरोधात...

मालमत्ताकरात मनपाकडून मोठे स्टेटमेंट; आयुक्त डांगे म्हणाले…

मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत कराच्या नाहीत / कर निर्धारित करण्यासाठी...