spot_img
ब्रेकिंगभरधाव आयशरची मॅक्सीमोला धडक! 'या' महामार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

भरधाव आयशरची मॅक्सीमोला धडक! ‘या’ महामार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

spot_img

पुणे । नगर सहयाद्री;
पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव परिसरात भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकने एका मॅक्सीमो कारला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक बसल्यानंतर ही कार पुढे थांबलेल्या बसला धडकली अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.

अपघात आयशर आणि एसटीच्या मध्ये आल्यानंतर मॅक्सीमो कारचा चक्काचूर झाला आहे. या घटनेत 9 जणांचा मृत्यू तर झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक पुणे महामार्गावर आयशर टेम्पो, प्रवासी वाहतूक करणारी मॅक्सीमो कार आणि एसटीमध्ये हा विचित्र अपघात घडला. आयशर टेम्पो हा ओव्हरटेकच्या प्रयत्नात असताना त्याची धडक मॅक्सिमो गाडीला बसली. यामध्ये मॅक्झिमो गाडीचा चक्काचूर झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी धाव घेत, जखमींना तात्काळ नारायणगाव मधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली.

अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना ०५ लाखांची मदत जाहीर
पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे मी पुणे पोलिस अधीक्षक यांना सांगितले आहे.
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक कराटेचा महामुकाबला’; भिडणार ‘इतके’ खेळाडू

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप 2025...

बाप रे! १० लाखांचे घेतले ‘एवढे’; सावकारकीचा गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री उद्योजक महेश सुरेश गावडे (वय 30 रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी) यांचे...

बालिकाश्रम रोडवरील अनधिकृत मजार हटवा; आ. संग्राम जगताप

अतिक्रमणाबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोडवर असणारे थडग्याचे अतिक्रमण काढावे...

बीड जिल्हा पुन्हा हादरला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू, तिसरा गंभीर

बीड / नगर सह्याद्री : बीड जिल्ह्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर...