spot_img
ब्रेकिंगधाड-धाड! अत्याचार करणाऱ्या नराधमाचा २४ तासांत एन्काऊंटर!, मोठा निर्णय...

धाड-धाड! अत्याचार करणाऱ्या नराधमाचा २४ तासांत एन्काऊंटर!, मोठा निर्णय…

spot_img

Crime News: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील आलमबाग परिसरात ३ वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार झाला होता. ४ जून रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे उत्तर प्रदेश हादरले होते. या बलात्कार प्रकरणातील आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी ५ पथके तयार केली होती. आरोपींवर १ लाखांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. आरोपीला पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने पोलिसांवर हल्ला केल्यामुळे पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आलमबाग मेट्रो स्ट्रेशन पुलाखाली ही घटना घडली. नवरा-बायको आपल्या ३ वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन झोपले होते. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास आरोपी दुचाकीवरून त्याठिकाणी आला. त्याने चिमुकलीचे तोंड दांबून तिला तिथून उचलून नेले. मेट्रो पुलाखालीच त्याने चिमुकलीवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी चिमुकलीला तिथेच गंभीर अवस्थेत सोडून पळून गेला होता.

पोलिसांना घटनेची माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये दुचाकीवरून आलेल्या आरोपीची ओळख पटली. दीपक वर्मा असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी १ लाखांच्या बक्षिसाची घोषणा केली होती. पोलिसांनी दुचाकीचा नंबर देखील ट्रॅक केला.

अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला शोधून काढले पण त्याला अटक करत असताना पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. डीसीपी सेंट्रल आशिष श्रीवास्तव यांनी सांगितले की, या प्रकरणात आलमबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आलमबाग व्हीव्हीआयपी रोडवर आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आरोपी ठार झाला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खरे असणारे दीड किलो सोने बनावट कसे झाले?: बाबासाहेब तांबे

गोरेश्वर पतसंस्था बाजीराव पानमंद व कुटुंबाने खासगी प्रॉपट असल्यागत चालवल्यानेच ही संस्था अडचणीत आली! पारनेर...

शिवसेना-मनसे युतीबाबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक विधान; आता थेट…

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे...

27 केंद्रांना कृषी विभागाचा दणका; किती परवाने केले निलंबित?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री खरीप हंगाम 2025 अनुषंगाने कृषी विभागाने जिल्हाभरात कृषी सेवा केंद्रांची व्यापक...

मनपा, झेडपीसाठी शिंदे सेना सज्ज; शनिवारी नगरमध्ये मेळावा

संपर्कमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे...