spot_img
अहमदनगरAhmednagar:नगरमधून पळवली, गुजरातमध्ये सापडली!! १७ वर्षांच्या मुलीसोबत घडलं काय?

Ahmednagar:नगरमधून पळवली, गुजरातमध्ये सापडली!! १७ वर्षांच्या मुलीसोबत घडलं काय?

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

नगर तालुयातील एका गावातून बळजबरीने पळवून नेलेल्या १७ वर्षाच्या मुलीला शोधण्यात नगर तालुका पोलिसांच्या पथकाला यश आले असून पोलिसांनी त्या मुलीसह तिला पळवून नेणार्‍या आरोपीला गुजरात राज्यातील बावला (जि. अहमदाबाद) येथे पकडले आहे. सागर रमेश मुदळकर (वय २५, रा. बाबुर्डी घुमट, ता.नगर) असे या आरोपीचे नाव आहे.

नगर तालुयातील एका गावातून दि.५ जानेवारी रोजी सकाळी ७ ते दुपारी १ या कालावधीत १७ वर्ष वयाच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून घरातून पळवून नेले होते. तिचा दिवसभर शोध घेवूनही ती मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी रात्री उशिरा नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादी वरून पोलिसांनी प्रारंभी अज्ञात व्यक्ती विरुद्ध भा.दं.वि.३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण हे करीत होते. तांत्रिक तपासात त्या मुलीसह आरोपी गुजरात राज्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रभारी स.पो.नि. नितीन रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलिस अंमलदार राजु खेडकर, संभाजी बोराडे, विक्रांत भालसिंग यांचे पथक गुजरातला गेले. तेथे त्यांनी या दोघांना शोधून काढत ताब्यात घेवून नगरला आणले. त्यानंतर पिडीत मुलीने दिलेल्या जबाबावरून आरोपी सागर याच्यावर अत्याचारासह पोसोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार काशिनाथ दाते धावले शेतकऱ्यांच्या मदतीला; सरकारकडे केली मोठी मागणी

पारनेर । नगर सहयाद्री आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना गुरुवार (ता. ३) चक्रीवादळ, अवकाळी पाऊस व...

तिघांनी केली न्यायालयाची फसवणूक; नगरमध्ये अजब प्रकरण

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- खोटे संमतीपत्र व शपथपत्र सादर करून न्यायालयाची फसवणूक केल्याचा प्रकार...

चार जणांच्या टोळक्याचे युवकावर धारदार शस्त्राने सपासप वार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- एका युवकावर चार जणांनी धारदार शस्त्र व लाकडी दांडक्यांनी...

शिर्डीत दुहरी हत्याकांड! दरोडेखोरांनी बाप-लेकाला संपवल

Ahilyanagar Crime News: एकीकडे शिर्डीत रामनवमीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे...