spot_img
अहमदनगरAhmednagar: पळापळ!! १०५ जणांवर ठपका, कारवाई होणार? अर्बन बँक प्रकरणात नवा ट्विस्ट

Ahmednagar: पळापळ!! १०५ जणांवर ठपका, कारवाई होणार? अर्बन बँक प्रकरणात नवा ट्विस्ट

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
नगर अर्बन सहकारी बँकेतील (बहुराज्यीय) कर्ज गैरव्यवहार व घोटाळा प्रकरणात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बँकेचे माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारिया (७२, रा. टाकळी ढोकेश्वर, पारनेर) यांना सोमवारी पहाटे आळेफाटा (पुणे) येथून अटक केली होती. त्यांना ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पोलिसांच्या या कारवाईने व्यापारी व बँकिंग वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी चेअरमनच अटक झाल्याने घोटाळा काळातील सर्वच संचालकांची पाचावर धारण बसली असून, त्यांची पळापळ सुरू झाली आहे.

अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. सुरुवातीला बँकेचे माजी संचालक तथा बँक बचाव समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २८ कर्ज गैरव्यवहार प्रकरणात सुमारे १५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे नमूद केले होते; परंतु पोलिसांनी कर्ज प्रकरणांचे ’फॉरेन्सिक ऑडिट’ केल्यानंतर ही रक्कम २९१ कोटी २५ लाखांपर्यंत पोहोचली आहे.

या अहवालात १०५ जणांच्या व्यवहारावर ठपका ठेवल्याने आरोपींची संख्या वाढण्याची शयता आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन माजी संचालक, दोन शाखाधिकार्‍यांसह कर्जदारांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. बँकेवर केंद्रीय सहकार मंत्रालयाने अवसायकाची नियुक्ती केली असून ठेवीदारांचे सुमारे ३०० कोटींहून अधिक रक्कम अद्याप अडकली आहे. हे पैसे परत मिळण्यासाठी ठेवीदार वेळोवेळी आंदोलन करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिका वॉर्ड रचनेची प्रतीक्षा संपली; तीन वॉर्डात काय आणि कसे झाले बदल पहा

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या...

भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन

अहिल्‍यानगर / नगर सह्याद्री - भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय...

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...