spot_img
अहमदनगरसंगमनेरमध्ये राडा! हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत काय घडलं?

संगमनेरमध्ये राडा! हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत काय घडलं?

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री:-
श्री हनुमान जयंती निमित्त महाराष्ट्रातील विविध ठिकाणी व मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. हनुमान जयंतीनिमित्त राज्यात उत्साह पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी मिरवणुका काढल्या. याच उत्साहाच्या वातावरणाला गालबोट लागलेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत जोरदार राडा झाला. आमदार आणि पोलिसांसमोरच राडा झाल्यामुळे याची नगरमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

अहिल्यानगरच्या संगमनेर शहरात हनुमान मिरवणुकीत जोरदार राडा पाहायला मिळाला. पोलीस आणि आमदारांसमोरच हनुमान रथ मिरवणुकीत जोरदार राडा झाला आहे. आयोजक आणि ढोल वादक या मिरवणुकीत भिडले. हनुमान रथासमोर ढोल वादनावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

स्थानिक आमदार अमोल खताळ आणि पोलिसांसमोरच हनुमान मिरवणुकीत जोरदार राडा झाला. ऐन मिरवणुकीत जोरदार राडा झाल्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत आयोजक आणि ढोल वादक यांच्यातील वाद मिटवला. वाद निवळल्यानंतर पोलिस बंदोबस्तात पारंपरिक पद्धतीने रथ मिरवणूक संपन्न झाली.

श्रीरामपुरात श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात
शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या जागृत देवस्थान हनुमान मंदिरात मोठ्या भक्तीमय वातावरणात श्री हनुमान जन्मोत्सव साजारा करण्यात आला. आज, 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6 वाजता श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.या पवित्र प्रसंगी हजारो भाविकांनी मंदिरात गद करत महाआरती, अभिषेक आणि हनुमान चालिसा पठणामध्ये सहभाग घेतला. मंदिर परिसर भक्तीमय भजनी रंगला असताना हनुमान जन्मोत्सवानिमित्त पाळण्याची दोरी ओढण्याचा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले, राजश्री ससाणे, संजय फंड, ज्ञानेश्वर मुरकुटे, वंदना मुरकुटे, नीरज मुरकुटे, मणीलाल पोरवाल, सुनील गुप्ता, योगेश गुप्ता, अरुण गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या. तर मंदिर परिसरात भक्तीगीते आणि हनुमान चालिसाच्या सामूहिक पठणाने आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला असून, श्री हनुमानाच्या कृपेने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत, अशी प्रार्थना यावेळी भक्तांकडून करण्यात आली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात पुन्हा सैराट! बहिणीच्या बॉयफ्रेंडला आई अन् भावाने संपवलं

पुणे । नगर सहयाद्री :- पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बहिणीच्या बॉयफ्रेंडचा...

‘पुढील आठवड्यात सरपंच आरक्षण सोडत’

महिला आरक्षण उपविभागीय, तर सर्वसाधारण अन्य प्रवर्गाचे तहसील पातळीवर काढणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री ग्रामविकास विभागाने...

फडणवीस सरकारचा ‘मोठा’ निर्णय; अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार

गैरप्रकार सहन केला जाणार नाही: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई | नगर सह्याद्री रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच...

फलक लावणे गैर काय? ते माझे काका!; आमदार रोहित पवारांनी भूमिका केली जाहीर

कर्जत । नगर सहयाद्री:- कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर...