spot_img
ब्रेकिंग९ लाख लाडक्या बहिणींचे १५०० रुपये बंद; नवे नियम काय? पहा लिस्ट..

९ लाख लाडक्या बहिणींचे १५०० रुपये बंद; नवे नियम काय? पहा लिस्ट..

spot_img

Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेतील लाडक्या पात्र-अपात्र बहिणीची पडताळणी सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत हजारांमध्ये असणारी संख्या आता चक्क लाखांवर जाऊन पोहचली असून राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार आहे.

नमो शेतकरी योजने’चा लाभ आणि ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेणाऱ्या ५ लाख महिला आहेत. या महिलांना ‘लाडकी बहिण योजने’तील फक्त 500 रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून १००० रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना वगळले जाणार आहे. चार चाकी वाहनं असलेल्या तसेच निकषात न बसणाऱ्या अनेक महिला आहेत. त्यांना ही अपात्र ठरवले गेले आहे.

पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळवा यासाठी कठोर पाऊले उचलली जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी बँकेत ई-केवायसी करावा लागणार आहे. ज्या महिला विविध सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे, त्यांचा या योजनेतून अपात्र केलं जाणार आहे. अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात तफावत आढळून आल्याने काही खात्याची जिल्हास्तरावरून फेरतपासणी करण्यात येणार असून त्यात अपात्र आढळलेल्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात येणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाणीपट्टीत वाढ, १ एप्रिलपासून किती होणार वाढ पहा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - तब्बल २२ वर्षानंतर महानगरपालिकेने घरगुती वापराच्या पाणीपट्टीत ९०० ते...

अण्णा हजारे आक्रमक, दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी

पारनेर / नगर सह्याद्री - समाजसेवक अण्णा हजारे वयाच्या ९० व्या वर्षी पुन्हा सक्रीय...

बापरे! दहावीचा पेपर फुटला; उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वाटल्या

जालना / नगर सह्याद्री - दहावी बोर्डाची परीक्षा आजपासूनच सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी...

कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीचा कहर! थेट मंत्र्याच्या कार्यालयातील व्यक्तीला मारहाण; पुण्यात खळबळ

पुणे / नगर सह्याद्री : कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या टोळीकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ...