spot_img
लाईफस्टाईलRoom freshener: कुबट दुर्गंध! घरबसल्या 'असा' करा सुगंधी रुम फ्रेशनर

Room freshener: कुबट दुर्गंध! घरबसल्या ‘असा’ करा सुगंधी रुम फ्रेशनर

spot_img

Room freshener: बदलत्या वातावरणानुसार घरात कुबट वास दुर्गंध पसरतो. ओलसरपणा ही घरात राहिला की घरात कुबट दुर्गंधी येते. ही दुर्गंधी नको नकोसे करुन सोडते. अशावेळी आपण बाजारात धाव घेत महागडे असे विविध सुगंधी रुम फ्रेशनर आणत घर अगदी सुगंधी करतो. पण, हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरच्या घरी देखील अगदी सहजरित्या स्वस्तात मस्त असे सुगंधी रुम फ्रेशनर तयार करु शकता.

फुलांची पाने

आपण दररोज देवाला वाहण्याकरता फुले आणतो. याकरता आपण आपल्याला जी फुले आवडतात त्याचा अधिक वापर करतो. त्याचप्रमाणे तुम्हाला आता ज्या फुलांची पाने आवडतात ती पाने घेऊन या. ती पाने चांगली स्वच्छ धुवा आणि त्यानंतर एका भांड्यात पाणी घ्या. त्या पाण्यात फुलांची पाने उकळण्याकरता ठेवा. पाने चांगली ३० मिनिटे उकळू द्या. त्यानंतर तो काढा स्प्रे बॉटलमध्ये गाळून घ्या. अशाप्रकारे तुमचा रुम फ्रेशनर तयार करू शकतात.

कापूर

रुम फ्रेशनर तयार करण्यासाठी तुम्ही कापूरचा नक्की वापर करु शकता. कापूला खूप छान असा सुगंध येतो. याकरता तुम्हाला काही कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्या वड्यांची पूड करा आणि ती पावडर स्प्रे बाटलीत भरा. त्यानंतर त्या पाणी टाका आणि थोडे गुलाब जल टाका. ही स्प्रे बाटली चांगली शेक करा. अशाप्रकारे कापूरपासून तुमचा रुम फ्रेशनर तयार होईल.

लवंग आणि दालचिनी

लवंग आणि दालचिनी वापरुन रुम फ्रेशनर बनवणे अगदी सोप आहे. याकरता तुम्हाला दोन ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यात लवंग आणि दालचिनी हे एक समान टाका आणि ते पाणी चांगले उकळवा. पाणी उकळल्यानंतर ते थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर ते स्प्रे बाटलीत भरा आणि त्याचा रुम फ्रेशनर म्हणून वापर करु शकतात.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...