spot_img
अहमदनगररोहित पवारांचा खळबळजनक आरोप; 'ते' EVM ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये घुसले..

रोहित पवारांचा खळबळजनक आरोप; ‘ते’ EVM ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये घुसले..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील कर्जत-जामखेडमध्ये आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यातील हायव्होल्टेज लढतीचा निकाल उद्या येणार आहे.मतदानाच्या दिवशी घडलेल्या या ड्राम्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. भाजपचे सुमारे 25 ते 30 कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ‘ईव्हीएम’ मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे’, असा गंभीर आरोप करत रोहित पवारांनी खळबळ उडवून दिली.

कर्जत-जामखेडमध्ये हायव्होल्टेज लढत होत असून, भाजप अन् राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार एकमेकांविरोधात थेट लढत आहे. मतदानाच्या दिवशी एकमेकांच्या कार्यकर्ते केस पैसे वाटत आहे, याची पोलखोल सुरू होती. रोहित पवार यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर पोस्ट शेअर केली आहे.

भाजपच्या (BJP) सुमारे 25-30 कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु माझे कार्यकर्ते आणि CRPF च्या जवानांनी संयमाने परिस्थिती हाताळली अन् हा प्रयत्न हाणून पाडला. या सर्वांचे आभार!, असे रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल न करण्याच्या भूमिकेवर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत गुन्हा दाखल करताना भाजपच्या दबावाखाली असलेल्या स्थानिक पोलिस प्रशासनाने मात्र सहकार्य करण्याऐवजी त्रास देण्याचीच भूमिका घेतली, याची निवडणूक आयोगाने योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

भाजप कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न म्हणजे पराभवाच्या भितीने सुरु असलेली गुंडागर्दी आहे. पण पुढील चोवीस तासातच कर्जत-जामखेडच्या जनतेकडून लोकशाही मार्गाने या गुंडगिरीला चाप बसल्याशिवाय राहणार नाही’, असा विश्वास देखील रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रामा तराळसह झावरे, खिलारी अडकले जाळ्यात; वाळू तस्करीच्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला प्रकरण

पारनेर | नगर सह्याद्री वासुंदे येथे वाळू तस्करीच्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीच्या...

… तर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार; अमित शाहांनी मांडली तीन विधेयके

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत तीन महत्त्वाची...

शनिशिंगणापूर प्रशासनाचा मोठा निर्णय, शनी अमावस्येला ‘या’ ठिकाणी भाविकांना प्रवेशबंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शनिशिंगणापूर येथील शनिदेव मंदिरात दरवर्षी शनी अमावास्येला लाखो भाविक दर्शनासाठी...

टेलेंम नसल्याने कचरा गाडीचा अपघात; जखमी लोखंडे यांची मोठी मागणी

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव रोड चौकात मंगळवारी सकाळी ८ वाजता घडलेल्या...